33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ धान विक्री करतांना शेतकर्‍यांना कुठलीही अडचण होऊ नये- आ. कोरोटे

धान विक्री करतांना शेतकर्‍यांना कुठलीही अडचण होऊ नये- आ. कोरोटे

0
30

blank

देवरी,दि.22 : मागील चार वर्षापासून हरदोली परिसरातील लोकांची धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होती. या करिता देवरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकरी खरेदी विक्री समितीचे पदाधिकारी ही प्रयत्न करीत होते. येथील शेतकर्‍यांनी ही बाब लक्षात आणून दिली तेव्हा तत्काल जिल्हाधिकारी यांना भेटून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे हरदोली व ककोडी येथे त्वरीत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. यावरून हरदोली येथे धान खरेदी सुरू झाले आहे. या केंद्रावर शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या शेतमालांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही धानखरेदी केंद्रावरील कर्मचार्‍यांची आहे. असे मत आमदार सहषराम कोरोटे यांनी व्यक्त केले.
सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाकडून आमदार सहषराम कोरोटे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छे देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मेहतरलाल कोराम हे होते. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर धरमशहारे, तज्ज्ञ संचालक लक्ष्मणनाईक, संचालक सदस्य संतोष खोटे, गिरधारी राऊत, जगदीश बावणकर, ऋषी कोरे, संतुलाल दरे, रामचंद्र परसगाये, तुकाराम नाईक, प्रमिलाबाई कोल्हारे, उपसरपंच गोपाल परसगाये यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण नाईक यांनी तर संचालन व आभार प्रभारी सचिव सुनिल औरासे यांनी मानले.

चिचगडः-आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कोकोडी अंतर्गत धानखरेदी केंद्राचे उदघाटन आमगाव-देवरी विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग सचांलक,सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष उत्तम मरकाम,सरपंच रीयाज खान ककोडी,तालुका काँग्रेस अध्यक्ष संदिप भाटीया,संचालक रावजी मुलेटी,भैय्यालाल जांभुळकर,चैनसिंग मडावी,बबलु भाटीया व मान्यवर पदाधिकारी,संस्थेचे सचांलक मडंळ, कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

blank