23.5 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ पंचनामे करुन मदत द्या नायब तहसीलदारांना कॉंग्रेसचे निवेदन

पंचनामे करुन मदत द्या नायब तहसीलदारांना कॉंग्रेसचे निवेदन

0
30

सालेकसा,दि.24ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात धानपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतपिकांचे उत्पादन अर्ध्यावर आले. काही शेतकऱ्यांना केवळ तणस घरी नेण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. इतकी विदारक अवस्था असताना प्रशासनाने केवळ पंचनामे करून गप्प बसण्यात धन्यता मानल्याचे दिसते. याबाबतचे निवेदनही तहसीलदारांना दिले आहे..

प्रशासनाने अवकाळी पावसात झालेल्या धानपिकाचे पंचनामे केले. परंतु, नुकसानभरपाई देण्याकरिता अद्याप कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शासन, प्रशासनाने नुकसानभरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी तालुका कॉंग्रेससह विविध संघटनांनी केली आहे.नुकसानभरपाईचे पाऊल अद्याप उचललेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. यासाठी प्रशासनाने नुकसानभरपाई त्वरित द्यावी, बॅंकांची दिवाळखोरी थांबवावी, अशी मागणी सालेकसा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.शेतकऱ्यांच्या पिंकांचे नुकसान झाल्याने नायब तहसीलदार भुरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री भरत बहेकार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम (बाबा)कटरे, तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, जिल्हा परिषदेच्या सभापती लता दोनोडे, कैलास अग्रवाल, ओमप्रकाश ठाकरे, लखनलाल अग्रवाल, शैलेश बहेकार, विजय फुंडे, नीतेश शिवणकर, आशुतोष असाटी, मंगेश चुटे, राजू जैन, ओमप्रकाश लिल्हारे, गुनाराम मेहर, मुकेश बैस, राजेश अडमे, मुस्ताक अन्सारी, संजय दोनोडे, मनोहर बारसे, रितेश लिल्हारे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.