अर्जुनी मोर. दि. २४ ::- तालुकास्तरीय सांस्कृतिक शाहिरी गायन व कला मंडळ ताडगाव ( ता अर्जुनी मोर.) च्या वतीने दि.30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दोन सत्रात शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर चित्रकला स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय अर्जुनी मोर. येथे होणार आहे.ही स्पर्धा दोन सत्रात घेण्यात येणार असुन वर्ग सहावी ते आठवी च्या विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी असुन त्यांना ” स्वच्छता अभियान ” या विषयावर तर वर्ग 9 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी ” स्त्रीभृणहत्या ” या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना मंडळाचे वतीने स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र देवुन गौरवण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व शाळा मधील मुला मुलींनी सहभागी होण्याचे आवाहन तालुकास्तरीय सांस्कृतिक शाहिरी गायन व कला मंडळाचे वसंत सोनवाने, कंचनदास कान्हेकर,सुत्तम लांडगे, पांडुरंग रामटेके, रामजी लंजे,मुकुंदा सोनटक्के, मंगला शहारे, ईश्वर मेश्राम यांनी केले आहे.





