30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ धादरी येथे अवैध रेतीचा ट्रॅक्टर जप्त

धादरी येथे अवैध रेतीचा ट्रॅक्टर जप्त

0
34

तिरोडा,दि.25ः–  मोठया प्रमाणात अवैध रेती,खराडी, मुरूम चोरी प्रकरणात वरिष्ठ अधिकारी रेतीमाफीयावर कडक कारवाई करण्यात घाबरतात. परंतु धादरी-उमरी सा.क्र. १८ येथील महिला तलाठी कु. बालकेश्वरी पटले यांनी गेल्या अनेक दिवसापासून अवैधरित्या होत असलेल्या रेतीच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाèयांच्या आदेशानुसार ट्रक्टर पकडून कारवाई करून दाखविले आहे.कर्तव्यावर स्त्री सुद्धा आपले कर्तव्य कोणत्याही आमीषाला किंवा भितीला बळी न पडता चोखपणे बजावू शकते हे दाखवून दिले आहे.त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील रेतीचोरांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून धादरी-उमरी येथील नाल्यातील रेती(खराडी)चे अवैधरित्या वाहतुक केली जात असल्याची माहिती नायब तहसीलदार वाकचौरे यांनी तलाठी बालकेश्वरी पटले यांना देऊन ट्रॅक्टर पकडण्याबाबद मौखिकरित्या सांगीतले. त्यानुसार २१ नोव्हेंबर रोजी तलाठी कु. पटले यांना ट्रॅक्टर क्र.एमएच ३५ जी ३६७७ रेती (खराडी) भरून जात असताना आढळल्यावर त्यांनी ट्रॅक्टरचा पंचनामा करून ट्रॅक्टर जप्त करीत तहसील कार्यालय तिरोडा येथे लावले. ट्रॅक्टर चालक दिपक रामचंद नागपुरे (४२) हे स्वतः ट्रॅक्टर चालवत होते हे विशेष, जप्तीनंतर घटनास्थळावर तहसीलदार प्रशांत घोरूडे, नायब तहसीलदार वाकचौरे यांनी प्रत्यक्ष ट्रॅक्टर मालकाशी चर्चा केली व नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे सांगितले. परंतु ट्रॅक्टर मालकाने ट्रॅक्टर धादरी रोडापासून तहसील कार्यालयाकडे नेतानी ट्रॅक्टर बिघडल्याचा बहाना केला, तेव्हा तहसीलदार प्रशांत घोरूडे यांनी दुसèया ट्रॅक्टरच्या मदतीने राजेंद्र प्रसाद यास तिरोडापासून रेती भरलेली ट्रॉली क्र.एमएच ३६ एल ३२०८ तहसील कार्यालयात जमा केली. परंतु लगेच काही वेळाने ट्रॅक्टर मालक आपले ट्रॅक्टर घेऊन पसार झाल्याचे बोलले जात आहे. यावर तहसीलदार कोणती कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

blank