28.9 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ सरसकट कर्जमाफीसाठी शिवसेनेने पाठविले मुख्यमंत्र्यांना निवेदन

सरसकट कर्जमाफीसाठी शिवसेनेने पाठविले मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
27

गोंदिया,दि.२५ः-नैसर्गिक अस्मानी संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकèयांना सावरण्यासाठी शासनाने आठ हजार रूपयांची मदत जाहीर करून शेतकèयांची थट्टा केली आहे.शेतकèयांची ही थट्टा थांबवून सरकारने शेतकèयांना सरसकट कर्जमाफी करुन न्याय देण्यात यावे.या मागणीचे मुख्यमंत्र्याच्या नावे असलेले निवेदन गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे व जिला समन्वयक पंकज यादव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सोमवारला तहसिलदारांना दिले.
त्या निवेदनात शेतकèयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.तसेच शेतकèयांवर कोणतीही अट घातली जाऊ नये.अतिवृष्ठी व अवकाळी पावसाने बाधीत झालेल्या सर्व शेतकèयांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी.शेतकèयांच्या मुलांना बारावी,महाविद्यालय परीक्षेची फी, दहावीची फी इतर फी सरसकट माफ करण्यात यावी.ज्या शेतकèयांना आपल्या शेताचा विमा उतरविला आहे,त्यांना निकष न लावता सरसकट पिक विमा मंजुर करण्यात यावे.शेतकèयांचे वीज बिल माफ करुन २४ तास विजपुरवठा करण्यात यावे.अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकèयांना पुढील हंगामासाठी शासनाने मोफत बी बियाणांचे वितरण करावे.जिल्ह्यातील सर्व शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकèयांचे पाखड धान खरेदी करण्याचे निर्देश देण्यात यावे.तसेच खरेदी झालेल्या धानाचे चुकारे त्वरीत देण्यात यावे,या मागण्यांचा समावेश आहे.सोबतच वरील मागण्यांकडे तत्काळ शासनाने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घेत शेतकèयांना न्याय मिळवून द्यावे अन्यथा शिवसेना पक्ष शेतकèयांच्या हितासाठी आंदोलनात्मक भूमिका घेईल असा ईशाराही दिला आहे. या प्रसंगी सुनील लांजेवर, सोनू चंद्रवंशी,गोलू डोहरे,अमर सिंह राजपूत,डील्लू गुप्ता,टोकेश हरिनखेडे , विनीत मोहिते, अशोक आरखेल, बबलू लील्हारे आशीष चौहान ,अरविंद टेंभरे ,जय भोयर, पंकज लीचड़े ,महेश हीरापुर, रवि तुरकर, जगदीश कुंजाम व अनेक शिव सैनिक उपस्थित होते.

blank