# #मागण्या मान्य करण्यासंबंधी अश्कोम कंपनी चे लिखित आश्वासन
गोंदिया,दि.26 : गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्हा परिषदे समोर सुरु असलेल्या उपोषण अखेर संपुष्टात आले असून जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने अश्कोम कंपनीना ६७ कंत्राटी रुग्णवाहिका चालकांच्या मागणीपुढे अखेर झुकावे लागले. गोंदिया जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात १०२ इमर्जन्सी सेवा पुरविण्याचे कंत्राट स्टेट हेल्थ सोसायटी, महाराष्ट्र मार्फत भोपाळ स्थित कंपनीला देण्यात आले होते. वेळेवर पगार ने देणे, २४ तास काम करवून घेत ओव्हर टाईमचे अतिरिक्त पैसे न देणे तसेच चालकांचे इन्शुरन्स देखील या कंपनीने काढले नव्हते. त्यामुळे विविध मागण्या पुढे ठेवत तसेच अश्कोम कंपनीकडून मिळत असलेल्या उडवाउडवीच्या उत्तराला कंटाळत गोंदिया जिल्हा शासकीय रुग्णवाहिका कंत्राटी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालासमोर उपोषण सुरु करण्यात आले होते.
आमदार विनोद अग्रवाल यांनी आंदोलन स्थळाला भेट देत चालकांच्या समस्या जाणून घेत लवकरात लवकर तोडगा काढण्यासंबंधी पाठपुरावा केला. विविध स्तरावर पाठपुरावा करत आधी कंपनीशी संवाद साधून उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केले. पण कंपनीने कसलाही तोडगा काढण्यास असमर्थता दर्शवल्याने अखेर जिल्हा परिषेदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे व्यथा मांडून ६७ कंत्राटी चालकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.स्टेट हेल्थ सोसायटीचे प्रतिनिधी यांनी मुंबईवरून गोंदियाला येत चालक संघटना, तसेच अश्कोम कंपनीच्या प्रतिनिधीना बसवून तोडगा काढण्यात आमदार अग्रवाल यांना यश आले.त्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या इन्शुरन्स बद्दल माहिती देणे, १२ महिन्याच्या सैलरी स्लीप देणे, सर्टिफाइड सैलरी स्लिप फॉर्मेट देणे, पी. एफ. व ई. एस. आई. सी. ची संपूर्ण माहिती, तसेच कर्मचाऱ्यांनी ओव्हर टाईम केल्यास लेबर कायदा १९७० प्रमाणे ओव्हर टाईम चे पैसे देणे या प्रमुख मागण्या अश्कोम कंपनीने लिखित स्वरुपात देत मान्य केल्या. गेल्या ७ दिवसात आ. विनोद अग्रवाल यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ६७ कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना आमदार विनोद अग्रवाल यांनी सुद्धा गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी राजा दयानिधी,जिल्हा आरोग्य अधिकारी श्याम निमगडे, DPM अर्चना वानखेडे तसेच स्वाती पाटील व मुंबई वरून आलेल्या प्रतिनिधीचे ६७ कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. येत्या ७ दिवसात कंपनीने मागण्या मान्य करणार असे लिखित आश्वासन दिले आहे.तसेच न झाल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल तसेच नियमाप्रमाणे कंपनीचे कंत्राट रद्द करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल अशा कडक शब्दात कंपनीला दम देखील देण्यात आला. दरम्यान उपोषणाला बसलेल्या वाहनचालकाला हृदय विकाराचा झटका येत जागीच मृत्यू झाल्याने योग्य ती भरपाई कंपनीने करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे तसेच त्यांना लवकरात लवकर विम्याचे पैसे मिळावे साठी देखील प्रयत्न करावे असे कंपनीला सांगण्यात आले आहे.
दरम्यान आविनोद अग्रवाल यांचे प्रतिनिधी म्हणून गोंदिया न. प. उपाध्यक्ष शिव शर्मा, गट नेते घनश्याम पानतवने, भाऊराव उके,सोनू कुथे,रोहित अग्रवाल, दुर्गेश रहांगडाले,अभय मानकर, दीपक बोबडे, सुजित येवले यांनी लिंबूपाणी पाजत उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडवले.उपोषण करणाऱ्यांमध्ये अध्यक्ष शेखर चन्द्रिकापुरे, उपाध्यक्ष रवि पडोळे, प्रकाश बारेवार, मनोज तिवारी, अल्ताफ पठान, दिनेश बल्ले, योगेशपुरी गंगादरयाव, संजय मड़ावी, सत्यप्रकाश डोहरे, जाहिद अली, रमन भोयर, लरेंद्र लावहतरे, सतीश नागपुरे, सुरेश रोकड़े, विजय मूंगमोड़े, राजू मेश्राम, रविन्द्र तिड़के, मयूर ठवकर, कुंदन तिघारे, विनोद भदाडे, ललित हार्दिये, राजेंद्र वाघाडे, सुरेंद्र चौधरी, एन. आर. बावनथडे, परमानंद लांजेवार, शेखर शरणागत, आनंद लांजेवार, उमेश्वर कावडे, फारुख पठाण, पवन कालसरपे, मनोज उपाध्याय, चंद्रशेखर पटले, भूषण उके, उत्तम राऊत, नरेंद्र हुकरे, राजेश खिरेकर, वासुदेव टेंभरे, राजेश भोयर, हरीचंद मारवाडे, लक्ष्मीचंद चौधरी, कृष्णकुमार सहारे, भेष्मन शिवणकर, नामदेव पडोळे, संजय पटले, संतोष रहांगडाले, योगीराज भोयर, रवीकमल प्रधान, रविकांत बोपचे, अशोक गायकवाड, अखिल शेख, ताराचंद उके, अतिक कुरेशी, देवराज मुनेश्वर, उरकुडे, संजय फरडे, किशोर लंजे, एस. के. खेडीकर, चंद्रकांत टेम्भुरकर, नंदकिशोर आगाशे, विजू सोनवाने, शिवकुमार फटीक, विजय चंद्रिकापुरे, मिलिंद शेंडे, कैलाश लाडे, नरेश उके, महेंद्र बुरले, देवानंद भोंडेकर यांचा समावेश होता.
Attachments area





