25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ पी एम किसान योजना आधार लिंक करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

पी एम किसान योजना आधार लिंक करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

0
273

गोंदिया दि.27:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत देण्यात आली आहे. त्याकरिता पात्र लाभार्थी स्वत: त्यांची नावे पीएम किसान पोर्टलवर जाऊन आधार लिंक करु शकतील किंवा आधार कार्डावरील नावाप्रमाणे दुरुस्ती करु शकतील.  तसेच पात्र लाभार्थ्यांना गावातील जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन आधार क्रमांक दुरुस्ती, आधार कार्डावरील नावाप्रमाणे दुरुस्ती करता येणार आहे. 1 डिसेंबर 2019 नंतर पात्र लाभार्थ्यास वितरीत करण्यात येणारे सर्व हप्ते आधार लिंक आधारीतच करण्यात येणार असल्याचे केन्द्र शासनाने निश्चित केले आहे.
पात्र लाभार्थ्यांना त्याकरीता पी.एम किसान पोर्टलवर Farmers Corener मध्ये Edit Aadhaar Failure Records ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमार्फत योजनेच्या लाभार्थ्यांना पोर्टलवर जाऊन स्वत: त्यामध्ये दुरुस्ती करता येईल. तसेच www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावर CSC LOGIN या सुविधेमध्ये आपले सरकार सेवा केंद्रामार्फत लाभार्थ्यांना आधार दुरुस्ती व इतर सर्व सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. जिल्हयातील सीएससी सेंटर यांना याबाबत सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक करणे अथवा आधार कार्डावरील नावाप्रमाणे दुरुस्ती करण्याची सेवा पुरविण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्देश देखील दिले आहेत. 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत  जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.