26.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home Top News शपथविधीसाठी 6000 चौरस फुटांचे व्यासपीठ, 60,000 खुर्च्या, 1 लाख लोकांची व्यवस्था

शपथविधीसाठी 6000 चौरस फुटांचे व्यासपीठ, 60,000 खुर्च्या, 1 लाख लोकांची व्यवस्था

0
33

मुंबई(वृत्तसंस्था)दि.28ः- दादरच्या शिवाजी पार्कवर शपथविधीसाठी सोहळा पाहण्यासाठी तब्बल एक लाखावर लाेक येण्याची शक्यता आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासह सुमारे ४०० शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई भव्य व्यासपीठ उभारत आहेत.राज्याभिषेकासारखी सोहळ्याची तयारी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाच्या बाजूला व्यासपीठामागे शिवरायांचा पुतळा व समोर शिवराज्याभिषेकाचे शिल्प असणार आहे. महाराष्ट्राची भव्यता व इतिहास या मंचाद्वारे मांडला जाईल. मंचावर १०० जणांच्या बसण्याची सोय असेल.

उद्धव ठाकरे हे संध्याकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला मनसे प्रमुख राज ठाकरे हेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

मंचावर बळीराजास मान

सेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून उपवास करत ८५ किमी अनवाणी पायाने पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला गेलेले शेतकरी संजय सावंतांना मंचावर स्थान असेल. सांगलीत त्यांनी उद्धव यांची भेट घेऊन सेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना मला स्टेजसमोर उभे करा, अशी विनंती केली होती.

२४ तासांत ६ हजार चौरस मीटरचे व्यासपीठ उभारले जात आहे. ६० हजार खुर्च्या टाकण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी सुमारे १ लाख लोक येथील अशी अपेक्षा आहे. तसेच २० ते २५ भव्य एलईडी स्क्रीनही असतील.

शिवसेनेची माहिती

राज्यपालांनी ६.४० ची वेळ दिली. केवळ २२ मिनिटांसाठी त्यांनी वेळ दिला अाहे.