*संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत गोरेगाव येथे तालुकास्तरीय मेळावा
* उत्कृष्ट प्रभागातील सदस्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन केला सत्कार.
गोरेगाव, दि,29:- – स्वच्छता ही लोक चळवळ व्हावी, जेणे करून प्रत्येक गावांत शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवता येईल असा सूर उपस्थित सर्वच मान्यवरांनी आवळला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन 2018-19 मधील उत्कृष्ट प्रभाग तसेच जिल्हा परिषद गट निहाय तपासणीत प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीचा सत्कार सोहळा 28 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती माधुरीताई टेंभरे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती लीनाताई बोपचे, जिल्हा परिषद सदस्या ललिता चौरागडे, जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई वालदे, माजी सभापती दिलीप भाऊ चौधरी, गटविकास अधिकारी झेड.डब्लू. टेंभरे, पंचायत समिती सदस्य केवलभाऊ बघेले, पंचायत समिती सदस्य पुष्पराज जणबंधू, पंचायत समिती सदस्य सौ. चर्जे , जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे शालेय स्वच्छता सल्लागार भागचंद रहांगडाले, कु. मेश्राम, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोमेश्वर रहांगडाले, सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शशी भगत आदी उपस्थित होते. यावेळी शालेय स्वच्छता सल्लागार श्री रहांगडाले यांनी प्रास्ताविक करताना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित अतिथी यांनी मार्गदर्शन करताना गाव विकासात सरपंच आणि ग्रामसेवक यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे विशद केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विस्तार अधिकारी पंचायत श्री सिंगनजुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाणी व स्वच्छता विभागाचे गटसमन्वयक बोहरे, समूह समन्वयक डहाट, कैलाश कोरे यांनी अथक परिश्रम घेतले.





