26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ चंद्रपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राज्यस्तरीय सहविचार बैठकीचे आयोजन रविवारी

चंद्रपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राज्यस्तरीय सहविचार बैठकीचे आयोजन रविवारी

0
31

चंद्रपूर,दि.29: राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, विद्यार्थी महासंघ व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी, अधिकारी महासंघ यांची राज्यस्तरीय बैठक १ डिसेंबर रोज रविवारला दुपारी २ वाजता स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालय चंद्रपूरच्या श्रीलिला सभागृहात अयोजित केली आहे. या बैठकीचे आयोजन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, कार्याध्यक्ष माजी खासदार खुशालचंद्र बोपचे, समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजुरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे.
सदर बैठकीला राष्ट्रीय ओŸबीसी महासंघाच्या सर्व शाखांच्या संघटनात्मक बाबीवर विचार करणे, सन २०२१ ला राष्ट्रीय जनगणना होणार आहे. १९३१ पासून ओबीसी समाजाची जनगणना झाली नाही. तरी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना होण्यासाठी कृती कार्यक़्रम आराखडा तयार करणे तसेच मागील चार वर्षापासून सातत्याने राष्ट्रीय ओबीसेी महासंघाचे पहिले अधिवेशन नागपूर, दुसरे नवी दिल्ली, तिसरे मुंबई व चौथे अधिवेशन हैद्राबाद येथे संपन्न झाले. ७ ऑगस्ट २०२० ला पाचवे महाअधिवेशनाचे स्थळ निश्चित करणे, या बाबीवर सर्वांगीण विचार करुन निर्णय घेण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला ओबीसी पदाधिकारी, कार्यक़र्ते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर,सुधाकर जाधवर,सहसचिव प्रा.शरद वानखेडे,खेमेंद्र कटरे,गुणेश्वर आरिकर, मनोज चव्हान,बबलू कटरे,प्रा.सुषमा भड ,दिनेश चोखारे ,विजय पिदूरकर,प्रा.संजय पन्नासे,शकील भाई पटेल,बबनराव फंड , बबनराव वानखेडे , प्रा नितीन कुकडे, प्रा बबनराव राजूरकर, प्रा विजय मालेकर ,रेखाताई बाराहाते,कल्पनाताई मानकर , निलेश कोडे ,रुचित वांढरे व सर्व शाखेचे पदाधिकारी यांनी केले आहे.