भंडारा,दि.29ः- जिल्हा कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा व भारतीय युवा सुशिक्षित बेरोजगार संस्था बारव्हाच्या संयुक्त विद्यमाने येथील शारदा सभागृह येथे पंडित दिनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.मेळाव्याचे उद्घाटक व अध्यक्ष जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदिप घुले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक बदर, भारत सरकार एम्लायमेंट अधिकारी पाचपोर, जिल्हा कौशल्य केंद्राचे बी. के. निंबार्ते, भारतीय युवा बेरोजगार संस्थेचे संस्थापक बालू चुन्ने, आर.सी.टीचे बोदेले, नितीन तुमाने, कोसरकर उपस्थित होते.उद्घाटक प्रदिप घुले यांनी बेरोजगार युवकांना मार्गदर्शन केले. बालू चुन्ने यानी युवकांना रोजगार मिळावा व स्वयंरोजगारातून रोजगार मिळून हाताला काम मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करण्याचे प्रामाणिक काम करणार आहे, असे सांगितले. प्रास्तविक जिल्हा कौशल्य विकाश केंद्राचे बी.के.निंबार्ते यानी केले.
रोजगार मेळाव्यामध्ये १७ कंपन्यांनी सहभाग नोदविला तसेच जिल्हा उद्योग केंद्र, स्टार प्रशिक्षण केंद्र, संत रोहिदास चर्मद्योग महामंडळ, अपंग महामंडळ, ओबीसी महामंडळ, महात्मा ज्यो. फुले महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णा साहेब पाटिल महामंडळ, तसेच मोठ्या संख्येत जिल्ह्यातील महामंडळ उपस्थितीत स्टाल लावण्यात आले व योजनांची माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन राकेश राऊत तर आभार छगन हेमने यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हितेश झोडे, निलेश भाजीखाये, अवी हेडाऊ, योगेश चुटे, रजनीकांत खंडारे, प्रज्वल निंबार्ते, आशिफ खान पठाण, शुभम वंजारी यांनी सहकार्य केले.





