नवेगावबांध,दि.29ः-येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या सत्तावीस विद्यार्थ्यांनी 25 नोव्हेंबरला कृषी विज्ञान प्रदर्शन नागपूर येथे भेट दिली.त्यानंतर या विद्यार्थ्यांची नागपूरच्या मेट्रो ट्रेनच्या सफारीचा आनंद घेतला.
ऍग्रो व्हिजनद्वारे आयोजित विदर्भातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन दिनांक 22 ते 25 या कालावधीत भरविण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व शेतीविषयी आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने नवेगाव बांध जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सहल नेण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन, शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला, शेती व शेतीला पूरक जोडधंदा याबाबत माहिती जाणून घेतली, कृषी यांत्रिकीकरण, जलसिंचन, पशूपालन, मत्स्यपालन, त्याप्रमाणे विविध शेतीपूरक व्यवसायातील व्यापकता, याबाबत जाणून घेतले.त्यानंतर नागपूर येथील नागपूर मेट्रो या नाविन्यपूर्ण उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भेट दिली.याकरिता बर्डी ते एअरपोर्ट पर्यंतच्या मार्गाने र्विद्यार्थ्यांनी मेट्रोमध्ये प्रवास अनुभवला. त्यामध्ये मेट्रो बाबतची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती.या अपूर्व नवलाईने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.त्यानंतर बदलत्या काळानुसार बदलत्या बाजारपेठा म्हणून, शहरातील एम्प्रेस मॉल या शॉपिंग सेंटरमध्ये भेट दिली. यामध्ये विद्यार्थ्यांनी बाजारपेठेचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांसोबत नवेगावबांध क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोने,विद्यालयाचे शिक्षक के. जी. मस्के, माया लाडे, सहाय्यक शिक्षक बालाजी राठोड शिक्षक विद्यार्थ्यांचा सह सहलीत सहभागी झाले होते.





