35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home शैक्षणिक गडचिरोलीत महात्मा फुलेंचा स्मृतीदिन शिक्षक दिन म्हणून साजरा

गडचिरोलीत महात्मा फुलेंचा स्मृतीदिन शिक्षक दिन म्हणून साजरा

0
29

blank

गडचिरोली,दि.29ः येथील अभिनव लाॅन येथे जिल्हा माळी समाज संघटनाव सर्व सामाजीक संघटनाच्या सहकार्याने महात्मा जोतीबा फुले यांचा स्मृतीदिन शिक्षक दिन म्हणून लोकसमुदायाच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.यावेळी अशोक शेंडे व त्यांच्या सहकार्यांंनी माझी आई कलामंच, नवेगांव वेलगुर तर्फे महापुरुषांवरील विविध सामाजिक गितांचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करुन आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी अशोक मांदाडे व पाहुण्यांच्या हस्ते विविध सामाजीक प्रश्नांवर भाष्य करणा-या कवितासंग्रह “अखंड प्रेरणा”  व ज्ञानज्योती फाऊंडेशन सावली तर्फे वाचनालयाकरीता निधी उभारण्याकरीता महापुरुषांशी संबंधीत दिनविशेष असलेले कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी बोलतांना मोनिकाताई काळे यांनी आज महिलांचा जो विकास झालेला दिसतो त्यामागे सावित्रीमाईंचा त्याग आहे. तसेच, बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु का मानले यावर सविस्तर विवचेन सादर करुन सावित्रीमाईंचा आदर्श बाळगण्याचा सल्ला दिला. समिर कदम यांनी सांस्कृतीक दहशतवादातून मुक्त होण्यासाठी महात्मा फुलेंचे साहित्य उपयुक्त असून ते वाचण्याची सवय आपल्या कुटुबिंयाना देणे गरजेचे असल्याचे सांगत महात्मा फुलेंनी शिवाची महाराजांची समाधी शोधुन काढली, मात्र ती दडवून ठेवली कोणी हे प्रश्न आपल्याला पडायला हवेत असे म्हणाले.नागभिड येथील संजय येरणे यांनी बहुजन समाजाच्या घराघरात साहित्यीक निर्माण होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. वणी येथील विचारवंत दिलीपभाऊ कोटरंगे ब्राम्हणी प्रतिके दूर सारुन सांस्कृतीक परिवर्तन अंगिकारणे आवश्यक आहे. बहुजन हितासाठी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे सरकार निवडून देण्याचे कार्य आपल्याला करावे लागणार असे सांगितले.
यावेळी समाजामध्ये प्रबोधन करुन लोकजागृती घडविणा-या मान्यवरांचा दरवर्षी *महात्मा फुले समाज शिक्षक पुरस्कार* देऊन गौरव करण्यात येत असतो. यावर्षी दादाजी खोब्रागडे, गजानन लोनबले,जयकुमार मेश्राम,निलकंठ लोनबले,नंदकिशोर नैताम हे पुरस्काराचे मानकरी ठरले. मान्यवरांचा गुलाबपुष्प व पुस्तक देऊन सहपरिवार गौरव करण्यात आला. तसेच यावेळी ज्योती-सावित्री अभिवादन उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या निवंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. कुमारवयीन गटात  प्रबोधी वेस्कडे, सुरज दहागावकर, गोंडपिपरी,नेहा महाडोळे,गडचिरोली,संचिता खेडेकर गडचिरोली,सुमित जेंगटे,  खुला गट विनायक लिंगायत अडपल्ली मुलचेरा,शुभम कोटरंगे, गडचिरोली,अक्षय उराडे धाबा गोंडपिपरी, नंदकिशोर मसराम आरमोरी व मोरेश्वर अंबादे गडचिरोली यांचा समावेश आहे.संचालन वंदना गुरनुले (शेंडे) यांनी केले.प्रास्ताविक भिमराज पात्रीकर यांनी व आभार गुरुदास बोरुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संघटनांच्या पदाधीका-यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास गडचिरोली तथा लगतच्या जिल्ह्यातील बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

blank