चंद्रपूर,दि.03 : शासनाने ओबीसींची जनगणना करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्याना घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आज मगळवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयामार्फेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविले.त्या निवेदनात २०२१ च्या राष्ट्रीय जनजणनेत ओबीसींच्या जनगणनेसाठी प्रपत्रात स्वतंत्र कॉलम तयार करून जनगणना करण्यात यावी, २०११ मध्ये झालेल्या जातीनिहाय जनणनेचा आकडा त्वरित जाहीर करण्यात यावा, ओबीसींसाठी लागू करण्यात आलेली नॉन क्रिमिलिअरची अट त्वरित रद्द करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गातील शेतकèयांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, ओबीसी प्रवर्गातील कर्मचाèयांना प्रमोशन आरक्षण देण्यात यावे,नवोदय विद्यालयात संधी देणे आदी मागण्यांचा समावेश होता.शिष्टमंडळात दिनेश चोखारे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर,रणजीत डवरे,योगेश धावडे,राजेंद्र गर्गेवार आदींचा समावेश होता.





