26.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ ओबीसींची जनगणना करा प्रधानमंत्र्याकडे निवेदनातून मागणी

ओबीसींची जनगणना करा प्रधानमंत्र्याकडे निवेदनातून मागणी

0
37

गोंदिया,दि.03 : शासनाने ओबीसींची जनगणना करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केल्या आहेत. याबाबतचे निवेदन मगळवारी (दि. ३) उपविभागीय अधिकाèयांमार्फेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. २०२१ च्या राष्ट्रीय जनजणनेत ओबीसींच्या जनगणनेसाठी प्रपत्रात स्वतंत्र कॉलम तयार करून जनगणना करण्यात यावी, २०११ मध्ये झालेल्या जातीनिहाय जनणनेचा आकडा त्वरित जाहीर करण्यात यावा, ओबीसींसाठी लागू करण्यात आलेली नॉन क्रिमिलिअरची अट त्वरित रद्द करण्यात यावी, खासगी उद्योगांत ओबीसी, एसस्सी, एसटी प्रवर्गाला लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावे, एसस्सी, एसटी, एसबीसी विद्याथ्र्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्तीप्रमाणे ओबीसी विद्याथ्र्यांनाही १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करावी, सरकारी नोकèयांत ओबीसी, एसस्सी, एसटीई सर्व प्रवर्गातील रिक्त पदांची विशेष भरती मोहीम राबबावी, एसस्सी, एसटी प्रवर्गातील शेतकèयांप्रमाणे ओबीसी प्रवर्गातील शेतकèयांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, ओबीसी प्रवर्गातील कर्मचाèयांना प्रमोशन आरक्षण देण्यात यावे, आरक्षणाची योग्यरितीने अंमंलबजावणी न करणाèया अधिकाèयांवर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, संविधानविरोधी शिक्षणनितीला प्रतिबंध घालण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. नायब तहसीलदार श्रीमती सरोदे यांना निवेदन देण्यात आले.blank

शिष्टमंडळात ओबीसी संर्घष कृती समिती कार्याध्यक्ष अमर वराडे,महासचिव मनोज मेंढे,शिशिर कटरे,आदिवासी नेता प्रा. नामदेवराव किरसान,राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहसचिव खेमेंद्र कटरे,सावन डोये,कैलास भेलावे,महेंद्र बिसेन,भारतीय पिछडा शोषित समाज संघटन अध्यक्ष प्रेमलाल साठवने,राजीव ठकरेले,प्रेमलाल गायधने,आशिष नागपूरे,सोमनाथ यादव,कमल हटवार, चिरजींव बिसेन, मोरेश्वर कुथे,राजेश साठवने,रमेश ब्राम्हणकर, श्री उदापुरे,मुनेश्वर कुकडे,नरेंद्र सिंद्रामे आदी उपस्थित होते.
संविधान मैत्री संघाच्यावतीनेही ओबीसींची जनगणना करण्यात यावी या मागणीचे निवेदन प्रधानमंत्र्याना पाठविण्यात आले.निवेदन देतेवेळी अतुल सतेदेवे,एड.विरेंद्र जायस्वाल,पुरुषोत्तम मोदी,सुनिल भोगांडे,सुनिल भांडारकर,राजेश ठाकरे,प्रमोद गजभिये आदी उपस्थित होते.
blankआमगाव तालुका ओबीसी संघर्ष कृती व सेवा संघ पदाधिकारी कृष्णा बहेकार, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष हरिष ब्राम्हणकर,प्रशांत गायधने,ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष लिलाधर गिèहेपुंजे, राजू सातनूरकर, तिरथ येटरे,बाळू वंजारी,नंदू कोरे,प्रशांत गायधने,चंद्रकांत उके,धीरज ठाकरे,मुकेश पडोळे,सोपान जिभकाते,नारायण मेश्राम,दिनेश तिरेलेसह पदाधिकारी यांनी तहसिलदार यांना निवेदन दिले.blank
सडक अर्जुनी तालुका ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्यावतीने तहसिलदारमार्फेत निवेदन सादर करण्यात आले.शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष दिनेश हुकरे,अशोक लंजे, अनिल मुनिश्वर, नगराध्यक्ष देवचंद तरोणे ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष भुमेश्वर चव्हाण, हेमराज मेंढे, सुधाकर कुर्वे, अनिल बावणे, राजेंद्र भेंडारकर, गायत्रीबाई इरले,रंजनाताई भुई, माधुरीताई यावलकर, रजनीताई गिर्हेपुंजे, नामदेव लंजे, माधव तरोणे,नरेंद्र डोंगरवार, देवेंद्र तुरकर,हरिष कोहळे, संगिताताई कोरे, सुशीला हत्तीमारे, दिनेश कोरे, आशिष येरणे,एस.आर.मते, डी.एल.कुकडे, मधुसुदन दोनोडे, रोशन बडोले, अर्जुन घरोटे, युवराज अंबुले, डॉ.सेवकराम रहागंडाले आदींचा समावेश होता.सालेकसा.गोंदिाय जिल्हा ओबीसी सुरक्षा दलाचे अध्यक्ष विजय फुंडे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे तालुकाध्यक्ष मनोज डोये,शैलेष बहेकार यांच्यासह ओबीसी संघटनेच्या पदाधिकाèयानी तहसिलदार यांना ओबीसी जनगणनेनेचे निवेदन सादर केले.