25 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ ‘आपला महाराष्ट्र दर्शन’ ची २३ वी सहल रवाना

‘आपला महाराष्ट्र दर्शन’ ची २३ वी सहल रवाना

0
55

गडचिरोली,दि.06ः- जिल्हा पोलिस दलातर्फे १४ ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या उज्‍जवल भवितव्यासाठी आपला महाराष्ट्र दर्शन सहन योजना राबविण्यात येते. त्या अंतर्गत आज गडचिरोली पोलिस दलातर्फे २३ व्या महाराष्ट्र दर्शन सहल रवाना झाली. या सहलीला अपर पोलिस अधीक्षक मोहीत कुमार गर्ग यांनी हिरवी झेंडी दाखली.
सन २0१३ पासून जिल्ह्याभरातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ८0८ मुले व ८१९ मुली असे एकूण १६२७ मुला-मुलींनी सदर सहलीचा लाभ घेतला असून आज रवाना करण्यात आलेल्या २३ व्या सहलीसाठी ८१ मुला-मुलींची निवड झाली आहे. यामध्ये ५ नक्षल पीडित व ५ नक्षल्यांचे नातेवाईकांचा समावेश आहे.
नक्षलग्रस्त अशा गडचिरोली जिल्ह्यातील मुला-मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व त्यांच्या मनातील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होऊन भीती नाहीश करण्यासाठी त्यांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी झालेली औद्योगिक, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीची माहिती व्हावी तसेच राज्याच्या इतर भागातील रूढी, परंपरांचे दर्शन घडविण्यासाठी पोलिस विभागामार्फत दरवर्षी आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजना राबविली जाते. यंदाची ही ४ थी सहल आहे. जिल्ह्यातील आदिवासी किशोरवयीन मुले-मुली महाराष्ट्र शासनाचे अँम्बेसेडकर म्हणून नक्षल प्रभावी क्षेत्रामध्ये बदल घडवतील हा उद्दात्तू हेतू असून पोलिस दलाचा हा स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांनी याचा फायदा भावी जीवनातील प्रगतीसाठी करून घ्यावा, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षकांनी केले.