
अर्जुनी-मोर/ संतोष रोकडे,दि.06ःअर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनच्यावतीने पाच डिसेबंरच्या रात्रीला नाकाबंदी करुन सहा डिसेबंरच्या रात्री 12:10 ते 12 32 दरम्यान इटखेडागावाजवळ नाकाबंदी करून चारचाकी वाहनासह दारू साठा जप्त केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीला कोम्बिंग ऑपरेशन व दरोडा पेट्रोलिंग करीत असताना एका चारचाकी वाहनातून दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकंडून मिळाली. आधारावर ठाणेदार महादेव तोंडले यांच्या मार्गदर्शनात ईटखेडा गावाजवळ नवेगावबांध कडून वडसाकडे जाणार्या पांढर्या रंगाच्या टाटा एस गाडीला( क्रमांक एमएच 35 के 44 70)थांबवून तपासणी केली असता या गाडीमध्ये 90 एमलने भरलेले सतराशे नग प्रत्येक नग किंमत तीस रुपये प्रमाणे 51 हजाराचा दारू साठा आढळला.त्यामुळे दारुसह चारचाकी वाहन किंमत एक लाख रुपये असा एकूण एक लाख 51 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी देवव्रत विश्वजीत सरकार (वय 21 वर्ष) राहणार गौरनगर तालुका अर्जुनी मोरगाव याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 239/2019 कलम 65ई 77अ 80मदाका अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार महादेव तोंडले यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक विजय कोटांगले करीत आहेत.




