33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता वन्यप्राण्यांची शिकार करणार्‍या चौघांना अटक

वन्यप्राण्यांची शिकार करणार्‍या चौघांना अटक

0
39

blank

गडचिरोली,दि.07ःमार्कंडा (कं.) वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र रेंगेवाही नियतक्षेत्र लोहारा अंतर्गत येत असलेल्या वनखंड क्र. १२९५ एफडीसीएम येथे वन्यप्राण्यांची शिकार करणार्‍या चार आरोपींना मार्कंडा वनपरिक्षेत्राच्या अधिकार्‍यांनी नुकतीच अटक केली. प्रमोद बालाजी मडावी (२७), संतोष संभाजी आत्राम (३0), चिरंजीव सुरेश आत्राम (२२), मनोज सिताराम गावडे (२0) सर्व रा. लोहारा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
लोहारा अंतर्गत येत असलेल्या वनखंड क्र. २९५ एफडीसीएम मध्ये विद्युतारेच्या सहाय्याने वन्यप्राण्याची शिकार झाल्याची माहिती माहिती मार्कंडा (कं.) वनपरिक्षेत्राच्या अधिकार्‍यांनी मिळाली. यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एस. मोरे, वनकर्मचारी एम. आर. मुत्येवार, रेंगेवाहीचे क्षेत्र सहाय बी. सि. निलम, लोहाराचे नियतवनरक्षक डब्ल्यू. एल. घुगलोत, कोठारीचे व्ही. डी. तिमाडे, वनरक्षक हेडावू, हजारे यांनी जंगलात गस्त करीत असताना आरोपी हे चितळाची शिकार करून कापत असताना आढळून आले. वनकर्मचार्‍यांनी आरोपींना व घटनास्थळावरून १५ किलो चितळाचे मास, १ चितळाचा चमडा, १ मृत चितळाचे पिल्लू, पाला, ३ किलो लोखंडी बारीक तार, १ कुर्‍हाड, २ सुरी, १ र्जमन गंज आदी साहित्य ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध वनगुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

blank