26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ जगत महाविद्यालयासह अर्जनी मोर,लाखनीत महापरिनिर्वाण दिन साजरा

जगत महाविद्यालयासह अर्जनी मोर,लाखनीत महापरिनिर्वाण दिन साजरा

0
92

गोरेगाव,दि.07- येथील जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगांव येथे महापरिनिर्वाण दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतिस अभिवादन करुन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निलकंठ लंजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डाॅ. एस.एच. भैरम तसेच सांस्कृतिक प्रमुख प्रा. बी.एम. राॅय, प्रमुख वक्ता डाॅ. बी.जी.सूर्यवंशी, डाॅ. आर. एम. गहाणे विचारमंचावर उपस्थित होते.याप्रसंगी डाॅ. बी. जी. सूर्यवंशी व उपप्राचार्य डाॅ. एस. एच. भैरम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. निलकंठ लंजे यांनी अनेक उदाहरण देत कशाप्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या प्रत्येक नागरिकांसाठी भरीव कामगिरी केली याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे विध्यार्थ्यांनी देखील त्यांचा आदर्श घेत आपण देखील उच्च शिक्षण घेऊन समाज कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. आर. एम. गहाणे तर सूत्रसंचालन प्रा. लोकेश कटरे तसेच आभार प्रा.बी.एम.राॅय यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी डाॅ. बी.बी.परशुरामकर,डाॅ. एस. टी. नंदेश्वर,डाॅ. व्ही. टी. गजभिये, डाॅ. कु.एम. के. देशपांडे, डाॅ. आर.बी. भैरम, डाॅ. सी.टी. राहुले,डाॅ. जी. के. भगत, डाॅ. एस.एस.रहांगडाले, प्रा. जे.आय.ठाकुर, डाॅ. आर. एन.साखरे, डाॅ. पी.बी. जवादे, डाॅ. कु. डब्ल्यू. जे. मेश्राम, प्रा. इ.व्ही. चंदनखेडे,डाॅ. विजय रहांगडाले,श्री. सोनवाने, श्री. रूकमोडे, श्री. मेश्राम तसेच अन्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख्याने उपस्थित होते.blank

तहसिल कार्यालयात महामानवाला आदरांजली
अर्जुनी मोर. :- तहसिल कार्यालय अर्जुनी मोर. येथे संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वान दिनानिमित्य आदरांजली वाहण्यात आली. सर्व प्रथम तहसीलदारांच्या दालनात उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व तहशिलदार विनोद मेश्राम यांचे हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला माल्यार्पण करुन  अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बोंडगाव देवी येथे महामानवाला आदरांजली
अर्जुनी मोर. तालुक्यातील बोंडगाव देवी येथे महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 वा महापरिनिर्वानदिन आदरांजली अर्पण करुन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम आनंद बुध्द विहार तथा मिलींद बुध्द विहारामधे गोंदिया जि.प.चे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांचे हस्ते निळाध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला. दोन्ही बुध्द विहारात भगवान बुद्ध व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांना तथा रमाई चौकात माता रमाई च्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी दोन मिनीटं मौन पाळुन बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी समाज संघटनेचे अध्यक्ष अशोक रामटेके, सचीव संतोष टेंभुर्णे, राजु ठवरे, धन्नु वालदे,भाग्यवान फुल्लुके, पुंडलिक भैसारे,जितेंद्र मेश्राम, एकनाथ बोधी,तथा शेकडो बौध्द समाज बांधव उपस्थित होते.

लाखनी येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…blank

महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखनी येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. लाखनी तालुका काँग्रेस, लाखनी तालुका सेवादल यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. चंद्रकांत निंबार्ते तर प्रमुख अतिथी म्हणून लाखनी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विशाल तिरपुडे, नगरसेवक दत्ता गिरेपुंजे, लाखनी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत वाघाये, लाखनी शहर सेवादलचे अध्यक्ष अनिल बावनकुळे उपस्थित होते.सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे प्राप्त झाला असं प्रतिपादन डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांनी केले तर भारतीय संविधान म्हणजे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली अमूल्य देणगी आहे असं प्रतिपादन प्रशांत वाघाये यांनी केले.कार्यक्रमाला वसंताजी कुंभारे, प्रवीण बावनकुळे, प्रिया खंडारे, संदिप बावनकुळे, शांताराम सेलोकर, बंडुभाऊ हजारे, सुरेश गजघाट, लोमेश खंडाईत, गोविंद मेघराजानी, चंदन अंबादे, राजकुमार खंडाईत, पवन देशमुख, विणा बावनकुले, सविता कुंभारे, अंबादे ताई आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन लोमेश खंडाईत यांनी केले तर आभार वसंताजी कुंभारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघर्ष व्यापारी संघटनेचे सहकार्य लाभले.

blank