तिरोडा,दि.07ः-मोहाडी तालुक्यातील आंधळगाव जवळील मलीदा येथील नातेवाईच्या लग्न समारंभ कार्यक्रमाला मोटारसायकलने जात असलेल्या दुचाकीस्वारांना तिरोडा येथील न्यायालयासमोर भरधाव वेगाने जाणार्या टिप्परने मागेहून धडक दिल्याने दूचाकीचालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.तुषार रामचंद्र धूमनखेडे( ४०) रा.मलिदा असे मृत ईसमाचे नाव आहे.तर मृतकाची पत्नी मागे दूचाकीवर बसली होती ती जखमी असून रुग्णालयात उपचार सूरू आहेत.
तुषार रामचंद्र धुमनखेडे हे मलिदा (आंधळगाव) येथील रहिवासी असून ते आपल्या पत्नीसोबत दुचाकीने गोंदिया येथे नातेवाईकांच्या लग्न समारंभ कार्यक्रमाला शुक्रवारी जात असताना तिरोडा येथे अपघात घडला.त्यात तो गंभीर झाल्याने उपचारार्थ गोंदिया येथील रूग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुली, वडील, आई, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.




