
गडचिरोली,दि.8: अहेरी तालुक्यातील पल्ले व येडपल्ली या ग्रामपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम राबविण्यात येत असून दिनांक 09 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. तहसिलदार, अहेरी यांच्या पत्रानुसार प्रस्तावित केल्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणूकीचे मतमोजणीचे ठिकाण व वेळ सुरक्षेच्या दृष्टीने पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. अहेरी, तालुक्यातील येडमपल्ली व पल्ले ग्रामपंचायतीची मतमोजणी सोमवार, दि. 09 डिसेंबर 2019 रोजी होणार असून मतमोजणी तहसिल कार्यालय, अहेरी येथे सकाळी 11.00 वाजेपासून होणार आहे असे, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकाकरीता मर्यादित भागासाठी सुट्टी जाहीर
गडचिरोली,दि.8: गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील 18- पेंढरी-गट्टा मतदार विभागाकरीता प्राप्त झालेल्या पोट निवडणूकीचे कार्यक्रमानुसार गुरुवार, दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून जिल्हा परिषद, गडचिरोली निवडणूक विभाग क्र.18- पेंढरी-गट्टा मधील मतदारांना गुरुवार, दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजीच्या पोट निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी मर्यादित भागासाठी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.




