26.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home शैक्षणिक बाक्टी व पिंपळगाव/खांबी येथे दिव्यांग दिन साजरा

बाक्टी व पिंपळगाव/खांबी येथे दिव्यांग दिन साजरा

0
54

अर्जुनी मोर.दि.08ः-दिव्यांग दिन व समान संधी सप्ताह निमित्य 5 डिसेंबरला जि.प.केंद्रीय.वरि.प्राथ.शाळा बाक्टी व जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंपळगाव/खांबी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शालेय विध्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून दिव्यांग जागृकतेबाबत घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी प्रभारी गटशिक्षणाधिकारी एन. जे.सिरसाठे व शिक्षण विस्तार अधिकारी ए.एस.बरईकर,केंद्रप्रमुख एम.बी.रतनपुरे,बाक्टीचे मुख्याध्यापक ओ.जे.वासनिक तसेच प्रमुख अतिथी म्हणून कु सी.एम.मेश्राम तालुका समन्वयक,पी.डी. गजभिये,वि.आर.नेरकर,कु बी.ऐन.सयाम विशेष शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी शाळेतील सहाय्यक शिक्षक एन.डी.लंजे यांनी सुत्रसंचालन केले.तर आभार प्रदर्शन एस.एच. चांदेवार यांनी मानले.

पिपंळगाव/खांबी-येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत जागतिक दिव्यांग दिन व जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस.आर.बागडे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वरदास ऊके , मुख्याध्यापक ए आर शहारे, किर्तीवर्धन मेश्राम,हंसराज खोब्रागडे, डी डी तागड़े, डी आर ठाकरे, डी व्ही हटवार, विलास भैसारे ,कुंजवना शिवनकर, दामिनी तरोने,
प्रमुख मार्गदर्शक तालुका समन्वयक वाय डी कापगते, विशेष शिक्षक एस पी नन्देश्वर ,के एन मंगर,प्रमोद ब्राम्हणकर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या छायाचित्राला अभिवादन करून माल्यार्पण करण्यात आले .यावेळी शाळेतील व गावातील दिव्यांग विद्यार्थी लक्ष्मी राखडे,भवेश राखडे,सौरभ कुंभरे, चोपराज शिवनकर, ठाणेश्वर कुंभरे,भारती मेंढे यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देउन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक योगेश कापगते यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष एस आर बागडे व प्रमुख़ अतिथि यांनी मार्गदर्शन केले.संचलन किर्तीवर्धन मेश्राम तर आभार हंसराज खोब्रागडे यांनी केले.