23.9 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ वाईट चालीरीतींना आळा घालणारा परमात्मा एक सेवक-आमदार रहागंडाले

वाईट चालीरीतींना आळा घालणारा परमात्मा एक सेवक-आमदार रहागंडाले

0
81

तिरोडा,दि.08ः- परमात्मा एक सेवक सम्मेलन हे कोणत्याही जाती धर्म पंथ याचा विचार न करता सर्व धर्म समभावाची भावना जनतेमध्ये जागृत करण्याचे एक चांगले माध्यम आहे. आज बहुतांश समाज व्यसनाधीन होवून घर उध्वस्त होत असतानाच अशा वाईट चालीरीती रूढी प्रथा परंपरापासून दूर होण्यासाठी जनतेनी परमात्मा एक सेवेच्या माध्यमातून व्यसनावर मात केल्याचे दिसत असल्याचे प्रतिपादन तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांनी केले.ते मतदारसंघातील मांडवी येथे आयोजित परमात्मा एक सेवक समाजाच्या सम्मेलनांत उदघाटनप्रसंगी बोलत होते.पुढे बोलतांना आमदार रहागंडाले म्हणाले की संमेलनाच्या माध्यमातून विविध विचारांचे आदानप्रदान होवून एका छत्राखाली येतात. आज या सेवकांची संख्या ६० हजाराच्या वर पोहोचल्याचे स्पष्ट होत असून महापुरुषांनी केलेले कार्य हे समाजविकासाठी पोषक ठरतात.ते प्रत्येक सेवकाने आपल्या जीवनात उपयोगात आणले पाहिजे असे म्हणाले.यावेळी माजी आमदार भजनदास वैद्य गुरुजी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मदनभाऊ पटले, सेवक तेजराम रहांगडाले व असंख्य सेवकबंधू उपस्थित होते.