32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या;लिंगा येथील घटना

अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या;लिंगा येथील घटना

0
34

नागपूर,दि.08ः कळमेश्वर तालुक्यातील लिंगा या गावातून गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय मुलीचा अखेर मृतदेह मिळाला.दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली असून तिच्यावर अत्याचार सुद्धा झाल्याची शंका आता नागरिकांनी उपस्थित केली आहे.घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असून नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे.दरम्यान काही नागरिकांनी पोलीस स्टेशनवर कँडल मार्च काढून घटनेचा निषेध केला. यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पीडित मुलगी ही आपल्या आई-वडिलांसह लिंगा या गावातील झोपडपट्टी मध्ये राहते. हे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील असून ते कामाच्या शोधाने गावात आले आहे. शुक्रवारी दुपारी आजीकडे जाते असे सांगून पीडित मुलगी ही घराबाहेर निघाली ती परत आलीच नाही.बराच शोध घेतल्यानंतर तुम्हीही ती मिळून आल्याने शेवटी नातेवाईकांनी कळमेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.दोन दिवसापासून तिचा शोध सुरू होता मात्र ती कुठेच मिळणार नाही.आज गावातील नागरिक व कुटुंबीय शोधत असताना ती अंगणवाडीच्या रस्त्याने नेहमी जाते त्याच रस्त्यावरील एका शेतात तिचा मृतदेह मिळून आला.तिचे अंतर्वस्त्र हे तोंडात कोंबून तिच्यावर दगडाने वार करून तिचे हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह कळमेश्वर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर श्वानपथक व तसेच ठसे तज्ञांना सुद्धा पाचारण करण्यात आले आहे.

blank