गोंदिया,दि.09ः-येत्या २०२१ च्या जनगणनेमध्ये ओबीसी प्रवर्गाची स्वंतत्र जातनिहाय जनगणना करण्यात यावे या मुख्य मागणीला घेऊन तसेच राज्यातील ओबीसी मंत्रालयासाठी ओबीसी सचिव नेमण्यासोबतच जिल्हास्तरावर सामाजिक न्यायविभागासारखे स्वतंत्र कार्यालय सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले,राज्यसभेचे सदस्य खासदार प्रफुल पटेल यांच्यासह गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सर्व आमदारांना रविवारला(दि.८)ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने देण्यात आले.
गोंदिया येथील सुभाष शाळेच्या मैदानावर आयोजित भंडारा-गोंदिया जिल्हा नागरी सत्कार समारोह समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात हे निवेदन देण्यात आले.ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात मा. उच्च व सर्वोच्च न्यायालयात विविध प्रकरणात ओबीसींची स्वतंत्र आकडेवारी नसल्याने संविधानिक हक्क देतांना अडसर निर्माण केल जाते. सविंधानाची कलम ३४० च्या पुर्ण अमलंबजावणीसाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना आवश्यक आहे.ओबींसीना स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षात ओबीसींचा संविधानिक वाटा-हिस्सा-प्रतिनिधीत्व-आरक्
तसेच महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेल्या ओबीसी मंत्रालयातील ७०० पदे अद्यापही हस्तातंरीत न केल्यामुळे जिल्हास्तरापासून मंत्रालयस्तरावर आजही सामाजिक न्याय विभागावर अवलंबून रहावे लागत असल्याने ती पदे तत्काळ हस्तातरींत करुन ओबीसी योजनासांठी स्वतंत्र सेवार्थ सुरु करण्यात यावे.ओबीसी मंत्रालयाचे विद्मयान सचिव जे.पी.गुप्ता यांना हटवून त्याठिकाणी ओबीसी आयएएस अधिकारी नियुक्त करण्यात यावे म्हटले आहे.या मागण्याकडे सरकारने गांभिर्याने लक्ष न दिल्यास जनगणनेच्यावेळी ओबीसी संघटना आंदोलनात्मक भूमिका घेऊन प्रगणकांना विरोध करेल अशा इशाराही देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमकर,ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे,ओबीसी संघर्ष कृती समिती महिलाध्यक्ष पुष्पा खोटेले,महासचिव शिशिर कटरे,रवी भांडारकर,प्रा.राजेंद्र पटले तिर्थराज उके,लिलेश्वर रहागंडाले,सोमेश रहागंडाले,बाबा बोपचे,चिरजिंव बिसेन,डॉ.संजिव रहागंडाले,भुमेश शेंडे,गौरव बिसने,दिनेश हुकरे,सुनिल पटले,रवी अंबुले,सुरेंद्र गौतम, राजीव ठकरेले,पप्पू पटले, जि.प.सदस्य कुंदन कटारे,प.स.सदस्य केवल बघेले,भुवन रिनायत,बाबा बहेकार,रवि क्षिरसागर,लालचंद चव्हाण आदी उपस्थित होते.




