सालेकसा,दि.09ः-येथे आयोजित 2 दिवसीय खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छतीसगढ या राज्यातून 26 संघांनी भाग घेतला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नागपूर संघाने गोंदियाचा 2-0 अशा पराभव करीत विजेतापद पटकावला.या स्पर्धेचा पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष बबलु कटरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सोहनभाऊ क्षीरसागर, राष्ट्रवादी जिल्हा उपप्रमुख लक्ष्मण नागपुरे, काँगेस अध्यक्ष वासुदेव चुटे, नगराध्यक्ष विरेंद्र उईके , भा ज पा अध्यक्ष परसराम फुंडे, मुख्यद्यापक राजू दोनोडे, सामजिक कार्यकर्ता राजू जैन उपस्थित होते.
विजेत्या नागपूर सांघाला आमदार सहेसराम कोरोटे कडून ७००१, द्वीतिय क्रमांक गोंदिया संघाला प्राचार्य ललित जीवांनी कडून ५००१ तर तृतीय क्रमांक बालाघाटला सोहनलाल क्षीरसागर कडून ३००१ व राजू दोनोडे मुख्ाध्यापकांकडून ट्राफी देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राकेश रोकडे तर आभार किशोर राठोड यांनी मानले. यशस्वीतेकरिता क्लब चे अध्यक्ष बबलू आंबेडारे, सचिव सुरेश चौहान, विकी वरखडे, कृष्णा चुटे, विजय उईके, बाळा प्रधान, भूपेश फरकुंडे, दीक्षित शिवणकर, गौरव घुगे, शुभम इडपाते, कु. अदिती वारखडे,कु. संध्या कुमडे, ऋतुजा घुगे, कुंदन मलखांबे, आकाश सिंगोडे यांनी सहयोग केले.





