30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home मराठवाडा/खान्देश दिव्यांगत्व ही लाचारी नाही तर संधी समजा-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनवणे

दिव्यांगत्व ही लाचारी नाही तर संधी समजा-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनवणे

0
60

blank

धुळेः- शहरातील  काकासाहेब बर्वे कन्या विद्यालयात 3 डिसेंबरला पार पडलेल्या दिव्यांग दिन कार्यक्रमात शहरातील दिव्यांग बांधवांना कुबड्यासह विविध साहित्याचे वितरण करण्याची एैनवेळेवर मिळालेली संधी मला दिव्यांगाच्या जिवनात नवा संदेशच नव्हे तर दिव्यांगाच्या जिवनातील अनुभव बघण्याची संधी मिळाली.आमचे मित्र व प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट  आप्पासाहेब बोरसे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून  मला आमंत्रित केले होते. अगदी कार्यक्रमाच्या पंधरा मिनिटांपूर्वी आलेल्या या प्रेमपूर्वक आमंत्रणाला मी नकार देऊ शकलो नाही. आणि तडक कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो तिथे जाऊन इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या दिव्यांग बांधवांना पाहून दिव्यांग बांधवांमध्ये संघटनांच्या, हक्काच्या जनजागृतीची मशाल पेटल्याची आनंदमय अनुभूती या कार्यक्रमात मला जाणवली.

त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले विचार मांडतांना धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे म्हणाले की, कुठल्याही सामाजिक पातळीवरील गोष्टीत किंवा घटकात परिवर्तन आणावयाचे असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे सामाजिक जनजागृती असते. अशी जनजागृती करण्यासाठी सामाजिक चळवळ उभी करावी लागते आणि तेव्हाच क्रांती घडून येत असते. आणि आजच्यासारखे मोठ्या संख्येने साजरे होत असलेले कार्यक्रम म्हणजेच या क्रांतीची नांदी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशी महत्वपूर्ण क्रांती घडून दिव्यांगांना त्यांचे नैसर्गिक हक्क प्राप्त व्हावेत म्हणून सामाजिक आणि राजकीय पातळीवर जनजागृतीचे काम करणारे आणि दिव्यांग बांधवांसाठी सातत्यपूर्वक लढा देणारे ऍडव्होकेट आप्पासाहेब बोरसे, त्यांच्यासोबत या चळवळीत खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व खंदे शिलेदार व सहभागी संस्था मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. आणि याची दखल सामाजिक आणि शासकीय पातळीवर घेतली जात आहे असे आशादायी चित्र आताशा समोर दिसायला सुरुवात झाली आहे.
मात्र या सगळ्या चळवळीला यशस्वी करण्यासाठी सर्व दिव्यांग बांधवांसोबतच समाजातील सर्व स्तरातून आणि दिव्यांग बांधवांच्या कुटुंबातून देखील पाठबळ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक पटलावर पाहिले तर आजपर्यंत दिव्यांग बांधवांबद्दल एक तर कुचकट, कुचेष्टेचा दृष्टीने बघितले जाते नाहीतर दयेच्या नजरेने तरी पाहिले जाते, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे ऐवजी आम्ही त्यांचेकडे चेष्टेचा विषय म्हणूनच पाहत असतो आणि त्यांच्या सुप्त शक्तींना आम्ही त्यांचा अतेताईपणा समजत असतो, अशा आशयाची एक खान्देशी म्हण देखील अस्तित्वात आहे (ती म्हण इथे सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही) महाभारतामध्ये कटकारस्थान करणारा खलनायक म्हणून शकुनीमामा याला दिव्यांग दाखविण्यात आले आहे. रामायणामध्ये कैकई चे कान भरून प्रभू रामचंद्राला वनवासात पाठविण्यासाठी कारणीभूत ठरलेली दासी मंथरा इला देखील दिव्यांग दाखविण्यात आलेले आहे तर अनेक हिंदी मराठी चित्रपटांमधील कुबड्या खवीस यासारखे दिव्यांग पात्र खलनायक दाखविण्यात आले आहे. असे दिव्यांग व्यक्तीला नेहमी समाजाच्या नजरेत उतरविण्याचे पातक विविध माध्यमातून कळत नकळत झालेलं दिसून येतं आणि त्यालाच बहुतांशी दिव्यांग बांधवांनी आपलं नशीब म्हणून स्वीकारलेलं दिसतं, मात्र आपण सगळेच हे विसरतो की माणूस हा शरीरा दिव्यांग असला नसला तरी त्याला आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रयत्नाच्या बळावर यश प्राप्त करता येत ।
उदाहरण द्यायचंच झालं तर , शरीराने पूर्णतः दिव्यांग असणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स यांनी त्यांच्या अफाट, अचाट बुद्धिमत्तेने जगाला दाखवून दिले की ज्याच्या जवळ बुद्धी आहे, आत्मविश्वास आहे, अशी व्यक्ती भल्याभल्यांना नतमस्तक व्हायला भाग पाडू शकते……
सन 2011 मध्ये रेल्वे प्रवास करताना आंबेडकर नगर, उत्तर प्रदेशची तरुण खेळाडू अरुणिमा सिन्हा हिला रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या बदमाशांच्या टोळीने लुटायचा प्रयत्न केला, मात्र मर्दानी काळजाची अरुणिमा सिन्हा आपल्याला बधत नाही हे लक्षात आल्यावर त्या बदमाशांनी अतिशय वेगाने पळणाऱ्या त्या रेल्वेतून अरुणिमा सिन्हा ला मध्यरात्रीच्या वेळी निर्मनुष्य ठिकाणी बाहेर फेकलं आणि त्यामुळे तिला आयमच अपंगत्व आलं. पण आपल्या अपंगत्वावर रडत न बसता अरूणिमा सिन्हा हिने कंबर कसली आणि गिर्यारोहक बचेंद्री पाल यांना भेटून त्यांचेकडून गिर्यारोहणाचे धडे घेतले आणि गुडघ्याखाली बसविण्यात आलेल्या कृत्रिम पायांनीशी अवघ्या तीन वर्षात जगातील सर्वोच्च शिखर माउंट एवरेस्ट सर केला. एवढेच नव्हे तर भल्याभल्यांनी नांगी टाकावी असे जगातले सर्वोच्च सात शिखरांवर पोहोचून आपल्या दिव्यांगात्वर मात केली. विजय मिळविला. हा विजय अरुणीमा ने आधी मनात मिळविला आधी मनत अनेकदा हा प्रचंड पर्वत सर केला मग प्रत्यक्ष सर केला आणि उभ्या जगासमोर हे सिद्ध केलं की कोणतीही व्यक्ती शरीराने दिव्यांग नसते तर मनाने दिव्यांग असते.
तुम्ही जर ठरवले तर, सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर जगातली अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुम्ही करू शकत नाहीत। यासाठी तुम्ही आत्मविश्वासाने जगायला हवं.
माझ्या दिव्यांग बांधवांच्या परिवाराला, नातलगांना आणि एकूणच सर्व समाजाला देखील कळकळीचे सांगणे आहे की आपल्यासारखेच जन्माला आलेले दिव्यांग बांधव सुद्धा सर्वसामान्य माणूस जे करू शकतो त्याच प्रमाणे ते देखील करू शकतात नव्हे तर त्याहूनही जास्त काही करू शकतात मात्र यासाठी त्यांना आपल्या सर्वांच्या आधाराची गरज आहे. त्यांच्यावर विश्वास दाखवण्याची गरज आहे. माझ्या दिव्यांग बांधवांना दयेची नाही तर संधी ची आवश्यकता आहे. ऍडव्होकेट आप्पा बोरसे साहेब यांच्यासारख्या चळवळीतील उमद्या नेतृत्वाच्या मजबूत खांद्यावर ही चळवळ यशस्वी सुरू असताना समोरील सकारात्मक चित्र पाहून शेवटी माझ्या दिव्यांग बांधवांना एवढंच म्हणीन,
*जिंदगी की असली उडान अभी बाकी है !
हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है !
अभी तो बस नापी है मुटठी भर जमीन !
आगे तो सारा आसमान अभी बाकी है !
जय हिंद, जय शिवराय, जय भिम, जय लहुजी

blank