नवेगावबांध,दिं.14ःयेथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील नवीन वर्ग खोलीच्या लोकार्पण प्रसंगी बोलतांना आमदार मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले की, पूर्वीच्या काळात शाळांमध्ये आज आहेत तशा भौतिक सुविधा नव्हत्या. तरीपण त्याकाळचे विद्यार्थी मोठ्या पदावर पोचले.त्या तुलनेत आज सर्व शाळामध्ये शासन भौतिक सुविधा उपलब्ध करुन देत असून इयत्ता 1 ते 4 हा प्राथमिक शिक्षणाचा पाया आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन यशाचे मोठे शिखर गाठावे असे विचार व्यक्त केले.ते येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे 13 डिसेंबरला नवीन इमारत वर्ग खोलीचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे हे होते. यावेळी अतिथी म्हणून गुलाब कोरेटी पंचायत समिती सदस्य,अनिरूद्ध सहारे सरपंच, दिनकर ठोसरे ठाणेदार, रमेश डोंगरवार शाळा समिती अध्यक्ष, लोकपाल गहाणे,शैलेश जायस्वाल दयाराम पंधरे, प्राचार्य काशीवार,परेश ऊजवणे, तंमुस अध्यक्ष महादेव बोरकर,ओमप्रकाश काशीवार, वाढई साहेब,अण्णा पाटील डोगरवार,सौ.लीनाताई डोंगरवार माजी सरपंच, प्रभारी गटशिक्षणाधिकारी निलकंठ शिरसाठे,मुख्याध्यापक एल.डी.सतदेवे, पठाण प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविक टी. एम.कापगते यांनी केले. एकनाथ डोंगरवार यांनी जमीन विकण्यास होकार दिला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश डोंगरवार ,मुख्याध्यापक व शिक्षकांनी लोकवर्गणी साठी फिरून, लोकवर्गणीतून 2लाख 35 हजार रुपये एवढा निधी उभा करण्यात आला.लोकांच्या सहभागातून, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक यांच्या परिश्रमातून ही नवीन वर्गखोली उदयास आली, असे त्यांनी सांगितले. तसेच नवीन इमारतीच्या वर दोन वर्ग खोल्या बांधकामासाठी आमदार व जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केली. उपस्थित अतिथीनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.इमारतीकरिता जमिन उपलब्ध करूण दिल्याबदद्ल ममता एकनाथ डोंगरवार यांचा यावेळी शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. लोकार्पण कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पदाधिकारी व ग्रामवासी महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कु एस.डी.मते यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षिका पठाण यांनी मानले.





