गोरेगाव,दि.14ः-तालुक्यातील मॉडेल कॉन्वेंट येथे वर्ग 1 ते 7 च्या विद्यार्थ्यांकडून बालसभेचे आयोजन (दि.13) करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक आर.डी.कटरे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे सहाय्यक शिक्षक आर.एम.कटरे,ओ.सी.बघेले हे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यानी रंगारंग कार्यक्रम सादर केले.बालसभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. याकरीता शाळेमध्ये सतत असे कार्यक्रम साजरे केले जाताता असे अध्यक्षस्थानावरुन बोलतांना आर.डी.कटरे म्हणाले. बालसभे मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आले. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.





