29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home शैक्षणिक संजय गांधी महाविद्यालय व मातोश्री सोनाबाई गोस्वामी कान्व्हेंटच्या स्नेंह संमेलनाचे उदघाटन

संजय गांधी महाविद्यालय व मातोश्री सोनाबाई गोस्वामी कान्व्हेंटच्या स्नेंह संमेलनाचे उदघाटन

0
53

गोरेगाव,दि.14ः तालुक्याती तेढा येथील संजय गांधी महाविद्यालय तसेच मातोश्री सोनाबाई गोस्वामी कान्व्हेंटच्या स्नेहसंमेलनाचे उदघाटन  काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ झामसिंग बघेले यांच्या अध्यक्षतेखाली विशाल शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पाहुणे म्हणन संस्था सचिव भाऊसाहेब गोस्वामी, सहसचिव विभाताई गोस्वामी, जि प सदस्या ज्योतिताई वालदे , डॉ लक्ष्मण भगत, उमेन्द्र रहांगडाले, पुथ्वीराज चौहान , सरपंच रत्नकलाताई भेंडारकर,उपसरपंच विवेकभाऊ मेंढे, माजी समाज कल्याण सभापती कुसन घासले, खुमेन्द्र मेंढे, यादवराव पारधी, डॉ भागवत बावनकुळे,प्राचार्य सुशांत गोस्वामी,कन्व्हेंट प्राचार्या डोये मॅडम, युवराज पटले, इंद्रराज वाघमारे, डॉ मनोज वालदे उपस्थित होते.

प्रास्तविक प्राचार्य सुशांत गोस्वामी यांनी केले.यावेळी डाॅ.झामसिंग बघेले यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले. भविष्यात नामवंत कलावंत व्हा अशा शुभेच्छा दिल्या.विशाल मेंढे यांनी व्यासपीठ म्हणजे सुप्तगुणाचा विकास यावर मार्गदर्शन केले. संस्था सचिव भाऊसाहेब गोस्वामी यांनी स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज आहे ती आत्मसात केल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही.त्याकरिता बी.ए. सिव्हिल सर्व्हिस यासारखे अभ्यासक्रम आपल्या महाविद्यालयात आणला असल्याचे सांगितले.डाॅ.विवेक मेंढे यांनी यशस्वी कलावंत होण्यासाठी शालेय मंचाची गरज असते असे सांगितले.विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मान्यवरांचे स्वागत ग्रो ग्रीन उपक्रम अंतर्गत झाडाचे रोपटे व संविधान पुस्तक देऊन करण्यात आले. प्रसंगी झाडांची प्रतिकृती पेंडाल मध्ये लावून झाडे वाचवा झाडे जगवा हा संदेश सर्वांना देण्यात आला. 10वी व 12वी परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समूहगित, नाटक, कोळीगीत, आदिवासी न्यूत्य ,रेकॉर्डिंग डान्स, रिमिक्स, पोवाडे, भारुळ असे विविध कार्यक्रम विद्यार्थी सादर  केले.मातोश्री सोनाबाई गोस्वामी कान्व्हेंट च्या चिमुकल्या विद्यार्थी यांनी विविधरंगी डान्स सादर केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी.झेड.कटरे,रहांगडाले, मुंगमोडे,शेंडे,ठाकरे,राऊत,तितरमारे,नांदेश्वर,पुंड,बिसेन,करणजेकर, सुखदेवे मॅडम,भोयर मॅडम, खंडाईत, धारगावे,पी.जी.कटरे, दुधबुरे,मोटघरे,चांदेवार,साखरे,रामटेके,कुकडे,एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रम संचालन प्रा.जी.एम.बघेले यांनी केले तर आभार खरवडे मॅडम यांनी मानले.

blank