23.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ गोल्डन कार्ड व्दारे १३०० रोगांचे उपचार नि:शुल्क

गोल्डन कार्ड व्दारे १३०० रोगांचे उपचार नि:शुल्क

0
34

गोंदिया,दि.16 : गरीब जनतेला वेळेवर आरोग्य सेवा मिळावी आणि उपचार मिळावे म्हणून महात्मा ज्योतिबा फुले योजने ला प्रधानमंत्री जन स्वास्थ्य योजनेत समावेश करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जनस्वास्थ योजनेची सुरवात २३ डिसेंबर २०१८ रोजी सुरू करण्यात आली. वर्ष २०११ च्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेनुसार, दा-ि रर्द्य रेषेखालील लोकांना लाभ देण्यात यावा याकडे भर दिले जात आला आहे. या निमित्त १२ डिसेंबरला गोंदिया येथील कुडावा ग्रामपंचायत येथे युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे घेण्यात आला. या मध्ये ३०० व महिला, पुरुष व बालकांची हेल्थ तपासणी करण्यात आली व त्यांना काही रोग असल्यास कार्ड तयार करून पुढच्या उपचारासाठी गोंदिया येथील ४ रुग्णालयात त्यांचा उपचार नि:शुल्क होणार असल्याचे हि माहिती येथील नागरिकांना या महाआरोग्य शिबिरा व्दारे देण्यात आली.

वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील १७१९८५ लोकांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तसेच आज पर्यंत या योजने दरम्यान १ लाख ७८ हजार लोकांचे कार्ड तयार करण्यात आली आहेत. महात्मा फुले जन स्वास्थ्य योजनेत ९७१ आणि नवीन ३२९ अश्या १३०० रोगांचे या योजनेत समावेश आहे. या योजनेंतर्गत ५ लाख रू. पर्यंत चा उपचार उपलब्ध केले जाते. ज्या कुटुंबांना प्रधानमंत्रीतर्फे पत्र पाठवण्यात आली आहेत. त्यांना गोल्डन कार्ड शासकीय रुग्णालय केटीएस, बीजीडब्ल्यू हॉस्पिटलमधून विनामूल्य बनविले जाते. व बाहेकर व न्यू गोंदिया रुग्णालयांकडूनही नि:शुल्क कार्ड तयार केले जाउ शकते. कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) च्या माध्यमातुन लोक आपले कार्ड बनवु शकतात

blank