गोंदिया,दि.१९ः- तालुक्यातील खळबंदा येथील तरुणीवर अॅसीड हल्ला करुन फरार झालेल्या आरोपींना पोलिसांनी सहा तासातच ताब्यात घेत त्यांना गजाआड केले आहे.खळबंदा येथील तरुणी ही नागपूर येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती.सुट्टी असल्याने ती गावाला आली होती.बँकेच्या कामानिमित्त ती एमआयडीसी मुंडीपार येथे आली असतांना ती बसस्थानकाजवळ उभी होती.त्या दरम्यान काळ्या रंगाच्या होंडा शाईन मोटारसायकलने तोंडाला कापड बांधून व हेल्मटे घालून आलेल्या दोन अज्ञातांनी तिच्यावर अॅसिड हल्ला करुन गंगाझरीच्या दिशेने बोपारा केला होता.त्या अॅसीड हल्याने तरुणीच्या चेहèयावर व शरीराच्या इतर भागावर गंभीर दुखापत झाल्याने गुन्हा दाखल करीत तपास कार्याला सुरवात केली होती.पोलीस अधिक्षक मंगेश कदम यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे,तसेच स्थानिक गुन्हे शाखा व गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास कार्याला सुरवात केली.४ वेगवेगळ्या चमू तयार करुन तपासाला सुरवात करण्यात आल्यानंतर जखमी तरुणीला उपचारादरम्यान विचारणा केली असता एकतर्फी प्रेमप्रकरणातून हल्ला केला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली.त्या अनुषंगाने तपासपथके तपास करीत असतांना व पिडीतेच्या मुलींसोबत गोंदिया येथे शिकणाèया गंगाझरी येथील मुलाने एकतर्फी प्रेमातून त्याच्या सोबतीसोबत सदर गुन्हा केला असल्याची बातमी मिळाल्यानंतर गोंदिया शहरातून गंगाझरी येथील मुलाला ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली असता त्यांने गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यानंतर धामनेवाडा येथील त्याच्या सोबतीला ताब्यात घेत विचारपूस केल्यावर त्यानेही कबुली दिल्याने दोघांनाही तत्काळ अटक करण्यात आले.नैराश्य व एकतर्फी प्रेमप्रकरणातून हे प्रकरण घडल्याचे उघडकीस आले असून अवघ्या सहा तासातच आरोपींना पोलिसानी अटक केले.याप्रकरणात गंगाझरीचे पोलीस निरिक्षक राहुल शिरे,सहा.पोलीस निरिक्षक रमेश गर्जे,प्रदीप अतुलकर,गणेश धुमाळ,उरकुडे,पोलीस उपनिरिक्षक तेंजेंद्र मेश्राम,पोलिस कर्मचारी लिलेंद्र बैस,विजय रहागंडाले,चंद्रकांत कर्पे,गोपाल कापगते,भुवनलाल देशमुख,कोडापे,दिक्षितकुमार दमाहे,धनंजय शेंडे,प्रभाकर पालांदुरकर,विनोद बैरय्या,संजय मारवाडे,विनय शेंडे,रेखलाल गौतम,नेवालाल भेलावे,अजय रहागंडाले,शेंदरे यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी व वाहनचलाकांनी तपास कारवाईत सहभाग घेतला.





