30.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home गुन्हेवार्ता १ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

१ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
35

गोंदिया,दि.23 : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये गत आठवड्यात जिल्ह्य़ातील अवैध धंदे व गुन्हे प्रतिबंधक कारवाईदरम्यान रामनगर व रावणवाडी पोलीसांनी १ लाख ३७ हजार ३५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रामनगर पोलीस ठाण्यातंर्गत कुडवा येथे ममता मनोज निकोसे हिने साठवून ठेवलेली ८ हजार किंमतीची हातभट्टीची दारु जप्त केली. गौतमनगर येथे प्रभा संजय प्रेम हिच्या घरुन ३ हजार ३६0 रुपयाची देशी दारु व ४ हजार ४00 रुपयांची हातभट्टीची दारु, पांढराबोडी येथे सट्टापट्टी घेणार्‍या संतोष लिंबादास गणवीर याच्याकडून १ हजार ५३0 रुपये जप्त केले. रावणवाडी पोलीस ठाण्यातंर्गत कामठा चौकात सुखसागर गुलाबचंद अग्रवाल याला सट्टापट्टी घेताना रंगेहाथ पकडून २ हजार ७४0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नवरगाव कला येथे सट्टीपट्टी घेणार्‍या हर्षवर्धन धानू सांडमारे याच्याकडून ४ हजार ६६0 रुपये, सावरीबोडी मैदानात पत्त्यावर जुगार खेळणार्‍या शिवा पुनाजी दमाहे, सागर सूर्यभान कोल्हटकर, जगदीश श्रीचंद तिवडे व वासुदेव राधेश्याम मरस्कोल्हे यांच्याजवळून १ लाख ७ हजार ६५0 रुपयांचा मुद्येमाल जप्त केला. तर तिरोडा पोलिसांनी कवलेवाडा मार्गावर सट्टापट्टी घेणार्‍या विरेंद्र टोलीराम बडगे याच्याकडून ६ हजार १0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्ष्क प्रदीप अतुलकर, पोलिस हवालदार कृपाण, फुलबांधे, गुरनुले, ठाकरे, पोलिस शिपाई हातझाडे, गौतम यांनी केली.