30.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home शैक्षणिक १९ वे जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक संमेलन १८ जानेवारीला

१९ वे जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक संमेलन १८ जानेवारीला

0
28

गोंदिया,दि.२४ : गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अंतर्गत गोरेगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने १८ जानेवारीला गुरुकृपा लॉन ठाणा चौक गोरेगाव येथे १९ गोंदिया जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांचे शैक्षणिक संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.उदघाटन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.स्वागताध्यक्ष म्हणून रविकांत बोपचे राहणार आहेत.विशेष अतिथी म्हणून आमदार विजय रहागंडाले,आमदार विनोद अग्रवाल,आमदार सहसराम कोरेटी,आमदार नागो गाणार,मारोतराव खेडीकर,शत्रुघ्न बिडकर,सतिश जगताप,अशोक पारधी,विलास बारसागडे,शिक्षण सभापती रमेश अंबुले,शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे,डायट प्राचार्य राजकुमार हिवारे,उपशिक्षणाधिकारी सुनिल मांढरे,राजेश रुद्रकार,सभापती माधुरीताई टेंभरे,नगराध्यक्ष आशिष बारेवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.