29.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ मुर्रीचे सरपंच येरणे पायउतार सर्वच सदस्यांनी नोंदविला अविश्वास

मुर्रीचे सरपंच येरणे पायउतार सर्वच सदस्यांनी नोंदविला अविश्वास

0
25

गोंदिया,दि.24 : मुर्री येथील सरपंच हेमंत येरणे यांच्यावर ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कारभार करीत असल्याचे कारण पुढे करून सर्व ११ सदस्यांनी तक्रारी नोंदविली होती. त्या तक्रारीवर (दि.२३) ग्रा.पं.च्या सभागृहात तहसीलदार भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलविण्यात आली होती. या सभेत सर्व ११ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाला हात वर करून सम्मती दिली. यामुळे थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच येरणे यांना पदावरून पायउतार व्हावे लागते. २ वर्षापूर्वी मुर्री ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत हेमंत येरणे हे विजयी झाले होते. मात्र निवडणुकीनंतर सभागृहातील सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने काम करतात, असा आरोप ग्रा.पं.चे उपसरपंच ओमप्रकाश रहांगडाले, ग्रा.पं. सदस्य ब्रम्हानंद शहारे, संदीप टेंभेकर, तिर्थराज रहांगडाले, करण टेकाम, निताबाई सुर्यवंशी, पुजाताई बिजेवार, मिनाताई टालटे, पुष्पाताई शरणागत, रामेश्वरी बोमचेर, सुनंदाताई जांभुळकर या सर्व ११ सदस्यांनी केला होता. दरम्यान या बाबीची तक्रारही तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे केली होती. यावर आज सभा बोलविण्यात आली. सभेत सर्व सदस्यांनी सरपंच हेमंत येरणे यांच्यावर अविश्वास नोंदविला. त्यामुळे ११ विरुद्ध १ मताने अविश्वास ठराव पारीत झाला. अविश्वास ठराव पारीत झाल्याने सरपंच हेमंत येरणे यांना पदावरून पायउतार होण्याची वेळ आली. अविश्वासनाने गेली थेट सरपंचाची विकेट युती शासनाच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेत मुख्य पदासाठी थेट निवडणूक प्रक्रिया राबविण्यात ठरविण्यात आले. त्यानुरूप जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये थेट निवडणुकीच्या माध्यमातून सरपंच आरुढ झाले. त्यातच गोंदिया जिल्ह्यात नियमांचा उलगड्यात दांडेगाव व भिवखिडकी येथील थेट निवडूण आलेले २ महिला सरपंच अपात्र ठरले. मात्र आजपर्यंत थेट निवडणुकीतून पदावर आरुढ झालेल्या सरपंचाना अविश्वासाचा सामना करावा लागला नव्हता. परंतु मुर्री येथील सरपंचावर अविश्वास ठराव पारीत करून त्यांना पायउतार करण्यात आले. ही जिल्ह्यातील अविश्वास ठरावातून गेलेली सरपंचाची पहिलीच विकेट आहे. हे विशेष.