गोंदिया,दि.30ः येथील कारंजा पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ डिसेंबर रोजी पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पोलिसांना २४ तास कर्तव्य बजवावे लागत असल्याने त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी,यासाठी पोलीस विभागातर्फे ठराविक कालावधीनंतर आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहयोग हॉस्पिटलचे प्रमुख जयशचंद्र रमादे, प्रमेश गायधने,डाॅ. दर्पण चौधरी,डाॅ.पोषण बिसेन,डाॅ.चंद्रशेखर जायस्वाल,डाॅ. चंद्रकिशोर पारधी,डाॅ.सुमित पिसे, अनुप अग्रवाल,डाॅ.संजय माहुले, प्रवीण धुवाधपारे यांनी आरोग्य तपासणी केली. ३८६ जणांना लाभ मिळाला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे,पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, रंगनाथ धारबळे, राहुल शिरे, सुभाष चव्हाण तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, त्यांचे पथक, मानव संशाधन शाखेचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, नायक पोलीस शिपाई राज वैद्य, राजू डोंगरे, मुस्तफा, सेवक राऊत उपस्थित होते.




