26.1 C
Gondiā
Monday, July 6, 2026
Home विदर्भ जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींचा विराट मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींचा विराट मोर्चा

0
37

भंडारा,दि.30ः-स्वतंत्र भारतात सन १९३१ नंतर आजपर्यंत ओबीसींची जातिनिहाय जनगणना झालीच नाही. त्यामुळे सातत्याने ओबीसींवर अन्याय सुरू आहे. ओबीसींची आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रगती रोखण्याचे कार्य सुरू आहे. म्हणूनच आजपर्यंत ओबीसींच्या विशाल समाजाची जनगणना करण्यात आली नाही. ओबीसींच्या जनगणनेसाठी दि. ४ जानेवारी रोजी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
जर २0२१ ला ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली तर ओबीसींची जनसंख्या ६0 टक्के आहे ही बाब कायदेशिररित्या सिद्ध होईल. हायकोर्ट व सुप्रिम कोर्टात आपली बाजू सर्मथपणे मांडून संख्येच्या प्रमाणात आरक्षण सुविधा मिळविता येतील. ओबीसींना शिक्षण, प्रशिक्षण व नोकर्‍यांमध्ये अधिकार प्राप्त होतील. लोकसंख्येच्या प्रमाणात राष्ट्रीय व राज्य अर्थसंकल्पात तरतूद करणे शासनाला भाग पडेल व ओबीसी युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटेल. ओबीसी वित्त महामंडळाची आर्थिक तरतूद वाढेल. एस. सी., एस. टी. प्रमाणे लोकसभा व विधानसभेत ओबीसींना राखीव मतदारसंघ मिळतील. प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती होईल. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सोय होईल. बार्टीसारख्या स्वायत्ता संस्थामार्फत देश विदेशात शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. गरिब शेतकरी, शेतमजुरांना ओबीसी संख्येच्या प्रमात घरकूल मिळेल, शेती साधनांची सवलत मिळेल, शेतकरी आत्महत्येला आळा बसेल. ओबीसी विद्यार्थ्यांना मेडीकल, इंजिनिअरींग, आयएएस, आयपीएस अधिकारी होताना ५२ टक्के जागा मिळतील.
ओबीसी विद्यार्थ्यांना पूर्ण स्कॉलरशिप व फी सवलत मिळेल. करिता ओबीसी जनगणना परिषद जिल्हा भंडाराच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटनांद्वारे शनिवारी (ता.४) सकाळी ११ वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सदर मोर्चा दसरा मैदान, शास्त्री चौक भंडारा येथून काढण्यात येईल. उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख समन्वयक सदानंद इलमे, जिल्हा समन्वयक भगिरथ धोटे, पांडूरंग फुंडे, मुरलीधर र्भे, संजय आजबले, भैय्याजी लांबट, गोपाल सेलोकर, डॉ. बाळकृष्ण सार्वे, के. झेड. शेंडे, सुर्यकांत इलमे, उमेश मोहतुरे, सुभाष आजबले, उमेश सिंगनजुडे, आनंदराव उरकुडे, गोपाल ठवकर, जयंता झोडे, विश्‍वजित पुंडे, अनंतलाल दमाहे, गोपाल देशमुख, मनोज बोरकर यांनी केले आहे.