27.9 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home विदर्भ विद्यार्थ्यांनी सदैव जिद्द चिकाटीने आपला लक्ष साधावे – आ. सहसराम कोरोटे

विद्यार्थ्यांनी सदैव जिद्द चिकाटीने आपला लक्ष साधावे – आ. सहसराम कोरोटे

0
25
सालेकसा,दि.17ः-   विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात सदैव आपली जिद्द, चिकाटीने, संकल्प घेऊन आपला लक्ष साधावे. गुरुवर्यानी दिलेले अनुशासन सदैव पाळावा असे विचार आमदार सहसराम कोरोटे यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणात व्यक्त केले.तालुक्यातील अंबिका बहुउद्देशीय शिक्षण संस्था सालेकसाच्या वतीने संचालित गवराबाई हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय झालिया येथे वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी उद्घाटक म्हणून आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम करोटे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरतभाऊ बहेकर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे पुरुषोत्तम कटरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमाताई मडावी, बाल कल्याण सभापती लताताई दोनोडे, शिक्षण सभापती जि. प. रमेश अंबुले, जि.प. सदस्य विजय टेकाम, संस्था अध्यक्ष सावलराम बहेकर, सचिव यादनलाल बनोठे, उपाध्यक्ष योगेश बहेकर, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष वासुदेव चूटे, जि.प. सदस्य राजेश भक्तवर्ती,एनएसयु अध्यक्ष आशुतोष असाटी, संजय दोनोडे, सरपंच अनिता ठाकरे, नितेश शिवणकर, कैलाश अग्रवाल,सेवा. नि. प्राचार्य दमाहे, पूर्व सरपंच घनश्याम नागपुरे, जेठू दमाहे, इतर प्रतिष्ठित नागरिक, सर्व शिक्षक वृंद,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे औचित्य साधून अंबिका बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित आमगाव/ देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांचा शाल,श्रीफळ, हार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक एन. एम. दमाहे व प्रास्ताविक प्राचार्य ए. के. ढेकवार तर आभार दिलीप बनोठे यांनी मानले.