30.2 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home गुन्हेवार्ता जुगार अड्ड्यावर धाड; सहा जणांना अटक

जुगार अड्ड्यावर धाड; सहा जणांना अटक

0
37

गोंदिया,दि.30 : तालुक्यातील नागरा येथील शिव मंदिरच्या मागील शेतशिवारात खेळ असलेल्या जुगार ठिकाणी पोलिसांनी धाड टावूâन सहा जणांना रंगेहात अटक केली. दरम्यान घटनास्थळावरून १ लाख ४१ हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई (दि.२८) सायंकाळी ४.३० वाजता सुमारास करण्यात आली. मनिष रामलाल नागपुरे (३०) रा.गोंदिया, लखन जीवन मेंढे (४९) रा.इर्री, रमेश अमरसिंग ठावूâर रा.किरणापुर (मप्र), नरेश कुंजीलाल गजरे (४२) रा.पांढराबोडी, कैलाश कन्हैय्यालाल बन्सोड (४४) रा.कटंगीकला, मंजील विनोद उके (२९) रा.कटंगीकला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नागरा शिवारात काही लोक जुगार खेळत आहेत. अशी खात्रीशिर माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांना मिळाली. या गोपनिय माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून जुगार खेळणाNया ठिकाणी धाड टाकली. दरम्यान घटनास्थळी सहा जणांना रंगेहात पकडण्यात आले. त्यातच घटनास्थळावरून ५ मोटारसायकल, ५२ पत्ती तास, रोख रक्कम असा एवूâण १ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सर्व आरोपींविरूध्द गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी
जगदिश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रदिप अतुलकर, सपोनि अभिजीत भुजबळ, उपपोनि उमेश भुटाळ, रोहितदास भोर, पोहवा भुरे, पटले, डिब्बे,बनोटे, गुरूभेले, ढाले, बिसेन, कोहळे, लिल्हारे यांनी केली.