34.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Top News ताडगाव रस्त्यावर नक्षल्यांनी लावले बॅनर

ताडगाव रस्त्यावर नक्षल्यांनी लावले बॅनर

0
242

blank

गडचिरोली,दि.०३:-भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे नक्षल्यांनी बॅनर बांधल्याचे आज सकाळी आढळून आले.ताडगावपासून १ किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या मधोमध हे बॅनर बांधले होते. बॅनरच्या दोन्ही बाजूंना दोन डबे ठेवून तार लांबविण्यात आल्याने स्फोटके असण्याच्या भीतीने नागरिक धास्तावले होते. बॅनर बांधल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत ठप्प होती. ८ मार्चला जागतिक जागतिक महिला दिन साजरा करावा, तसेच फॅसिस्ट शक्तींविरुद्ध लढा उभारण्याचे आवाहन नक्षल्यांनी बॅनरद्वारे केले आहे. या बॅनरवर भाकपा(माओवादी) पेरमिली एरिया कमीटी असे लिहिले आहे.

नक्षल विरोधी कारवाई झालेल्या ताडगाव भागात दोन वर्षानंतर नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाले असून आज मंगळवारला नक्षलवाद्बांयानी तीन लाल रंगाचे बॅनर बाधुन मोदी सरकार व ठाकरे सरकाच्या विरोधात मजकुर लिहिला.तसेच ८ मार्च महिला दिवस साजरा करा असाही मजकुर उल्लेख केला आहे.या नक्षली बॅनरमुळे आलापल्ली – भामरागड मार्ग आज सकाळ पासुन बंद पडली आहे.भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस स्टेशन अंर्तगत 2018 मध्ये नक्षललविरोधी पोलीस पथकाने नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता