30.6 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home गुन्हेवार्ता ३.३७ लाखांचा गुटखा केला नष्ट

३.३७ लाखांचा गुटखा केला नष्ट

0
321

गोंदिया,दि.18 : येथील बायपास मार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून जाणाऱ्या वाहनात ३ लाख ३७ हजाराचा गुटखा वाहून नेत असताना अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अखिलेश राऊत यांनी १९ जुलै २०१९ ला पकडले होते. त्या गुटख्याला न्यायालयाची परवानगी घेऊन गोंदियाच्या डंम्पींग यार्डात जाळून आज (दि.१७) रोजी नष्ट करण्यात आले.१९ जुलै रोजी एमएच ३५ के ९७६ या वाहनात विनोद रूपलाल चंदेले (४३) रा. वॉर्ड क्र. ६ हिरापूर भरवेली चौकी बालाघाट हा त्या गुटख्याला वाहून नेत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व अन्न औषध प्रशासनाचे निरीक्षक अखिलेश राऊत यांनी सदर गुटखा जप्त केला होता. आरके सुपर प्रिमीयम क्वालीटी हुक्का व गोल्डन ब्राऊन रंगाच्या पॅकेटमध्ये सुगंधीत तंबाखू जाळण्यात आले. हा तंबाखू ३ लाख ३७ हजार ३२० रूपये किंमतीचा होता. नगर परिषदेतर्फे मरघट रोडवरील डम्पींग यार्डात हा तंबाखू जाळण्यात आला. प्रसंगी निरीक्षक अखिलेश राऊत, नमुना सहाय्यक वैभव पराते उपस्थित होते.