32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ कोविड 19 प्रतिबंधासाठी जिल्हा यंत्रणेसोबत राष्ट्रीय सेवा योजना सज्ज

कोविड 19 प्रतिबंधासाठी जिल्हा यंत्रणेसोबत राष्ट्रीय सेवा योजना सज्ज

0
134

भंडारा,दि. 21:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ अंतर्गत भंडारा जिल्हातील एकुण 31 महाविद्यालयातील 3450 रासेयो स्वंयसेवकानी करोना संक्रमण व लाकडाऊनच्या आपातकालीन स्थितीत समाजात शासकीय यत्रंणेबरोबर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवीत आहे.

 जिल्हयातील स्वंयसेवकांनी आपले कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राष्ट्रिय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक नोडल अधिकारी प्रा.डॉ.किशोर नागपुरे यांनी प्राचार्य डॉ.हरेष त्रिवेदी, विद्यापीठ रासेयो संचालक डॉ.केशव वाळके, कुलगुरु व कुलसचिव याच्या नेतत्वात आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारा झुम ॲप व यूट्यूब मार्फत कोविड-19 विषाणुची माहिती, फेस माक्स बनिवण्याची, सोशल डिस्टेंस संबंधी 2000 रासेयो स्वंयसेवकाना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. 25 महाविद्यालयाच्या रासेयो कार्यक्रम अधिकाराची ऑनलाईन मिटींग व प्रशासनाची माहितीचे आदान-प्रदान व जनजागृती कार्याची माहिती विद्यापीठ व प्रशासनला रोज देत आहे.

रासेयो स्वयंसेवकांनी आपल्या मोबाईलद्वारे आणि स्थानीय प्रशासकीय यंत्रणेच्या अधीन राहून आप-आपल्या गावात गरजू लोकांना मदत करीत आहे. आतापर्यंत जिल्हयात रासेयो स्वयंसेवकांनी स्वनिर्मीत 3800 फेस माक्सचे वितरण केले आहे, 2300 गरजू लोकांना खाद्यसामग्रीचे वाटप केले, 600 लोकांना सॅनिटाझर व हेंडवॉश वाटप केले, 12,500 लोकांना आरोग्य सेतु एप डाऊनलोड करवून आरोग्याची माहिती दिली आहे. तसेच लॉकडाऊन काळात मानसीक ताण कमी     करण्याकरीता योगाभ्यास करण्यास सांगितले. पोस्टर व एंकाकीका तयार करुन सोशल मिडीयाद्वारे जिल्हयात 60 हजार लोकांमध्ये जनजागृती केली व सध्या करीत आहे.

यूवा कार्य मंत्रालया चे IGOT Portal मार्फत स्वंयसेवकाना ट्रेनिंग मटेरियल बद्दल माहिती देत आहे. भंडारा जिल्हयात प्रशासनाला फ्रंटलाईन मध्ये कार्य करण्यासाठी एकुण 417 रासेयो स्वंयसेवकानी  आपली नोंदणी केली आहे. रासेयो जिल्हा समन्वयक डॉ.किशोर नागपुरेच्या नेतृत्वात, विभागीय समन्वयक प्रा.डॉ. धरमसारे लाखनी, प्रा. विलास शिवनकर साकोली, प्रा.डॉ.गणवीर भंडारा, प्रा.डा गिता गभने, प्रा.डॉ.भोजराज बडोले लाखादुर, डॉ.गिरीपुंजे लाखनी, प्रा.डॉ.श्रीरामे भंडारा, प्रा.कोकने एम.आय.टी. शहापूर, प्रा.डॉ. नाना जाधव, इत्यादि प्राध्यापक तसेच जिल्हातील महाविद्यालयाचे रासेयो स्वंयसेवक व विद्यार्थी समाज जनजागृतीच्या कार्यात सतत सहभाग करीत आहे.

जिल्हयात कोरोनाच्या लॉकडाऊन काळात रासेयो स्वंयसेवकांनी प्रशिक्षण घेऊन स्वत:घरी फेस मास्क बनवून वाटप केले व समाजात जनजागृती करीत आहेत— प्रा. डॉ. किशोर नागपुरे,जिल्हा समन्वयक व नोडल अधिकारी