34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय आमदार रहागंडालेंसह भाजप नेत्यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

आमदार रहागंडालेंसह भाजप नेत्यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

0
516

blank

गोंदियाःदि.२१;कोरोना या संसर्गजन्य आजरामुळे लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने निर्माण झालेल्या अनेक अडचणींचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे.त्या सर्व सामान्य नागरिकांसह स्थलातरींत नागरिकांना सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात या विषयाला घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कक्षात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्यासह माजी आमदार राजकुमार बडोले, गोपालदास अग्रवाल व हेमंत पटले यांनी जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे यांच्याशी चर्चा केली.तसेच गरजुना व बीपीएल,एपीएल कार्डधारकांना ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार रेशनचे धान्य आपातकालीन निधीतून पुरविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.सोबतच धानाचे चुकारे व बोनस देण्यात यावे यावरही सोशल डिस्टqसग पाळत चर्चा करण्यात आली.सोमवारला खासदार प्रफुल पटेल यांनी चर्चा केल्यानंतर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतले होते,त्यानंतर आज भाजपचे नेते जिल्हाधिकारी कार्यालयात पोचून लाकडाऊन काळातील परिस्थितीतवर चर्चा केली.

blank