भंडाराःदि.२१;कोरोना या संसर्गजन्य आजरामुळे लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने निर्माण झालेल्या अनेक अडचणींचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे.त्या सर्व सामान्य नागरिकांसह स्थलातरींत नागरिकांना सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात या विषयाला घेऊन राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी आज मंगळवारला(दि.२१)जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत चर्चा केली.जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन,जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे,मुख्य कार्यपालन अधिकारी भुवनेश्वरी,नैसर्गिक आपत्ति अधिकारी अभिषेक नामदास यांच्याशी सोशल डिस्टqसग पाळत खासदार पटेलांनी चर्चा केली.यावेळी तुमसरचे आमदार राजू कारेमोरे हे सुध्दा उपस्थित होते.जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व औषधाचा साठा,धानाचे चुकारे व बोनसच्या प्रलंबित रक्कमेचे तातडीने वाटप करणे,कायदा आणि सुव्यवस्था,स्वस्त अन्न धान्य दुकानातून शिधापत्रिका अन्न धान्य उपलब्ध करुण देणे, शासनाने मदद केलेल्या निधीचे बँकेच्या मार्फ़त वाटप करणे, लॉकडाउनमुळे भंडारा जिल्ह्यात राहावे लागलेल्या नागरिकांना जेवण आणि राहण्याची सोय व्यवस्था करण्यात यावे.मनरेगा अंतर्गत काम तातडीने सुरु करणे,भंडारा, तुमसर, पवनी, साकोली येथील नगर परिषदे मार्फत नियमित सैनीटाईझेशन, साफसफाई करणे, मानमोडी या रोगामुड़े धान, भाजीपाला, टरबूज, आदि नुकसान ग्रस्त पिकाची माहिती शासनास सादर करण्याबाबत चर्चा केली.





