गोंदिया दिं.23.:: जिल्ह्यात देवरी तालुक्यातील 1 गाव/वाड्यामध्ये, गोरेगाव तालुक्यातील 15 गावे/वाड्यामध्ये व तिरोडा तालुक्यातील 27 गावे/वाड्यामध्ये, अशा एकूण 43 नविन विंधन विहिरींच्या कामांना जिल्हाधिकारी गोंदिया यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
देवरी तालुक्यातील मुरपार येथे दयारथ शहारे यांच्या घराजवळ. गोरेगाव तालुक्यातील सिलेगाव येथे उमराव बिसेन यांच्या घराजवळ, बबई येथे ज्ञानसिंग बघेले यांच्या घराजवळ, चांदीटोला येथे रामलाल हरिणखेडे यांच्या घराजवळ, घोटनटोली येथे उत्तम पटले यांच्या घराजवळ, सोनी येथे हनुवंत बोपचे यांच्या घराजवळ, नोनीटोला येथे शालीकराम खरोले यांच्या घराजवळ, बाम्हणी येथे लक्ष्मीचंद बोपचे यांच्या घराजवळ, बोटे येथे इंद्रराज कटरे यांच्या घराजवळ, सर्वाटोला येथे मनीराम कोहरे यांच्या घराजवळ, कटंगी/बु. येथे देवेन्द्र चौधरी यांच्या घराजवळ, चंद्रपूरटोली येथे रमेश पटले यांच्या घराजवळ, तुमखेडा/बु. येथे योगेश्वर पटले यांच्या घराजवळ, तुमसर येथे सुरजलाल अंबादे यांच्या घराजवळ, देऊटोला येथे ईश्वरलाल सुर्यवंशी यांच्या घराजवळ, झांजिया येथे मोरश्वर बिहारी यांच्या घराजवळ.
तिरोडा तालुक्यातील इंदोराटोला इंदोरा/बु. येथे प्रकाश शेंदरे यांच्या घराजवळ, बिहिरीया येथे बौध्द विहाराजवळ, चांदोरीटोला (चांदोरी खु.) येथे प्यारेलाल अंबुले यांच्या घराजवळ, खैरलांजी येथे मोहन चौरागडे यांच्या घराजवळ, भगतटोली (गोंडमोहाडी) येथे पतीराम मेन्ढे यांच्या घराजवळ, गोधरीटोला (अर्जुनी) येथे डिलेश्वर पटले यांच्या घराजवळ, परसवाडा येथे सुनिल वनवे यांच्या घराजवळ, बोरा येथे अशोक केवट यांच्या घराजवळ, जमुनानगर (मुंडीकोटा) येथे सार्वजनिक वाचनालय जवळ, घोघरा येथे ग्रामपंचायत जवळ, घाटकुरोडा येथे विनोद कुंझलवार यांच्या घराजवळ, चांदोरी/बु. येथे अंगणवाडी जवळ, चिरेखनी येथे देविदास रहांगडाले यांच्या घराजवळ, सिंदीटोला (पालडोंगरी) येथे मधु पंधरे यांच्या घराजवळ, सिंदीटोला (बेरडीपार) येथे काशीराम मेश्राम यांच्या घराजवळ, करटी/बु. येथे सुरजलाल बिसेन यांच्या घराजवळ, करटी/खु. येथे मनोल चौरे यांच्या घराजवळ, सर्रा (निलागोंदी) येथे बळीराम संतापे यांच्या घराजवळ, कोडेलोहारा येथे राजेंद्र उईके यांच्या घराजवळ, नवेझरी येथे गणेश उईके यांच्या घराजवळ, सोनेखारी भाऊदास कोवाचे यांच्या घराजवळ, सिल्ली येथे रुपेश सांगोडे यांच्या घराजवळ, माल्ही येथे भाऊजी चौधरी यांच्या घराजवळ, गांगला येथे नगर पाणीपुरवठा योजनेजवळ, मारेगाव येथे दयाराम फुंडे यांच्या घराजवळ, लाखेगाव येथे बालु राऊत यांच्या घराजवळ, विरसी येथे वैष्णवी हॉटेलजवळ. अशा एकूण 43 ठिकाणी 47 लक्ष 24 हजार 238 रुपयांमधून नविन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.




