24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेसने चंद्रपूरात नोंदवली अर्णव गोस्वामी विरुध्द तक्रार

महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेसने चंद्रपूरात नोंदवली अर्णव गोस्वामी विरुध्द तक्रार

0
224

चंद्रपूर,दि.23ः- महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्यावतीने ‘पालघर मध्ये घडलेल्या दोन साधूंसह तीन जणांच्या निर्घृण हत्येचा आम्ही निषेध नोंदविण्यात आला असून कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रासह देशाचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याचे म्हटले आहे.सोबतच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्या अर्णव गोस्वामी विरुध्द तक्रार नोंदविण्यात आली आहे.

समाजात जातीय आणि धार्मिक विद्वेषाची भावना पसरविण्यासाठी काही माध्यमे जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीच्या अर्णब गोस्वामी याने अशाच पद्धतीने सामाजिक विद्वेष पसरविणाऱ्या टिप्पणी करून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या सोबतच कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या संदर्भातही अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरून वैयक्तिक पातळीवर घृणास्पद टिप्पणी केल्याने चंद्रपूर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्द तक्रार नोंदविण्यात आली आहे.अर्णव गोस्वामीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस सचिव मो. कादर शेख,चंद्रपूर विधानसभा सचिव प्रकाश देशभ्रतार, हर्षित रामटेके आदींनी केली आहे.