26.9 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ सिरोंचा-मंचेरियलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची सीमेवर भेट

सिरोंचा-मंचेरियलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची सीमेवर भेट

0
420

गडचिरोली,दि.24ःजिल्ह्यात महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील भागाला गुरुवारी तेलंगणच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन महाराष्ट्र पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गडचिरोलीसह तेलंगणलगतच्या भागात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात ही चर्चा असली तरी, गेल्या काही दिवसांपासून तेलंगण आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात वाढलेल्या माओवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती घेण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्याचा सिरोंचा तालुका हा तेलंगण सीमेला लागून आहे. सिरोंचा तालुक्याला तेलंगणच्या मंचेरीयाल आणि पूर्वीच्या करीमनगर जिल्ह्याचा भाग असलेल्या जयशंकर भोपालपल्ली जिल्ह्याची सीमा लागून आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी आणि प्राणहीता या दोन नद्यांच्या ६० किलोमीटर भागावर महाराष्ट्र आणि तेलंगण पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. गुरुवारी मंचेरियाल जिल्हा पोलिस प्रमुख असलेले रामगुंडमचे पोलिस आयुक्त सत्यनारायण यांच्या नेतृत्वात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी प्राणहीता नदीच्या पुलाजवळील तपासणी नाक्याला भेट दिली. तिथे सिरोंचा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी आणि पोलिस निरीक्षक अहीरकर यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत लाकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करताना दोन्ही बाजुने किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कुठलाही अडथळा न करता सुरू ठेवण्यावर एकमत झाले. तसेच सिरोंचा येथील नागरिकांना आवश्यक महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधा तेलंगणच्या मोठ्या शहरांत उपलब्ध असल्याने अशा रुग्णांना प्रवास करू देण्यासंदर्भात चर्चा झाली.

blank