गोंदिया,दि.24ःगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते यांनी आज 24 एप्रिलला गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात पोचून जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकिला जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे,पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.राजा दया निधी,भाजपचे जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर,देवरी तालुका भाजप अध्यक्ष प्रमोद संगीडवार,भाजयुमो प्रदेश सदस्य हितेश डोंगरे उपस्थित होते.
खासदार नेते यांना राज्यातून व बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले असून लक्षणे आढळलेल्या नागरीकांची कोरोना तपासणीसाठी नमुने घेतले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी बलकवडे यांनी दिली.तसेच बाहेरील नागरिकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही सांगितले.925 नागरिक क्कावरंटाईन मध्ये असून 55 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविल्याचे सांगितले .यावेळी भाजप महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी सालेकसा तालुक्यातील बोगाटोला येथे 15 मुस्लिम कुटुंबाना धान्य मिळाले नसल्याची बाब लक्षात आणून दिली.खासदार नेते यांनी त्या कुटुंबाना ताबडतोब अन्न धान्याचा पुरवठा करण्याच्या सूचना केल्या असता जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी उद्या 25 एप्रिल रोजी त्यांना धान्याचा पुरवठा करण्यात येईल असे सांगितले. लॉकडाऊन बाबत माहिती विचारली असता पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन व्यवस्थित सुरु असून विनाकारण फिरणाऱ्या वाहन धारकावर कार्यवाही करण्यात आल्याचे सांगितले.





