23.6 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home शैक्षणिक सर फाउंडेशनच्या नूतन जिल्हा समन्वयकांची पहिली बैठक उत्साहात

सर फाउंडेशनच्या नूतन जिल्हा समन्वयकांची पहिली बैठक उत्साहात

0
200

गोंदिया दि.25ः सर फाऊंडेशनच्यावतीने 23 एप्रिल रोजी सर (SIR- State Innovation and Research) फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धराम माशाळे, बाळासाहेब वाघ, राजकिरण चव्हाण व राज्य महिला समन्वयक हेमा शिंदे यांच्या मार्गदर्शनात व सतीश सातपुते यांचे सूत्रसंचालनात राज्यातील सर फाऊंडेशनच्या नवनियुक्त जिल्हासमन्वयकांची पहिली सभा online Zoom App द्वारे यशस्वीरित्या पार पडली. झूम मीटिंगमध्ये सर फाउंडेशनची रचना/विविध उपक्रम याबाबत सविस्तर माहिती व्हिडिओद्वारे देण्यात आली.
सर्व नवनियुक्त जिल्हा समन्वयकांचा परिचय घेण्यात आला. जिल्हा समन्वयक यांची जबाबदारी समजून सांगण्यात आली.राज्य स्तरावरून प्रत्येक जिल्ह्याला SIRF(जिल्हा नाव)या नावाने व्हाट्सअप ग्रुप तयार करून देण्यात आलेला आहे. त्यात जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक शिक्षकांना समाविष्ट करण्यात यावे असे सुचविले आहे. जिल्हा समन्वयकांनी सर्व तालुक्यात एक महिला व पुरुष शिक्षकांची तालुका समन्वयक म्हणून निवड करण्याची सूचना देण्यात आली. सर फाउंडेशनच्या राज्यस्तरावर सुरू असलेले दोन महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली, ज्यामध्ये इनोव्हेशन शिक्षकांसाठी व अविष्कार हा विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेला नवीन उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्याची माहिती देण्यात आली.
सर्व जिल्हा समन्वयकांनी सर फाउंडेशन या NGO च्या कामाबद्दल व नियोजनाबद्दल समजून घेऊन नवीन काही उपक्रमाबद्दल आपले मत सुद्धा व्यक्त केले. जिल्हा समन्वयकांचे प्रश्न व शंका यांचे प्रभावी समाधानकारक उत्तर बाळासाहेब वाघ सर व सिद्धाराम माशाळे सरांनी देऊन शंकाचे निरसन केले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात नवनियुक्त जिल्हा समन्वयकांनी सर फाऊंडेशनच्या कामाला गती देऊन नवसंकल्पक शिक्षकांना नव्या ध्येयाने नवीन विचार प्रवाहात पुढे येण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. उपक्रमशील शिक्षकांना कारण नवं तेच हवं एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित सर्व शिक्षक एकत्र आणणे व त्यांच्या उपक्रमशीतेची साखळी महाराष्ट्रचं नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर पोहचवणे हाच मूळ उद्देश आहे असे स्पष्ट करीत सर्वांना स्टे होम स्टे सेफ असा संदेश राज्य महिला समन्वयक हेमा शिंदे यांनी देऊन जिल्हा समन्वयकांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. झूम मीटिंग चे आभार प्रदर्शन करून राज्यस्तरीय समन्वयक बाळासाहेब वाघ यांनी झूम सभा संपल्याची घोषणा केली. सदर झूम मिटींगला गोंदिया जिल्ह्यातील नवनियुक्त महिला जिल्हा समन्वयक जयश्री नीलकंठ सिरसाटे, समन्वयक दिलीप होटे, मनोहर कटरे हे उपस्थित होते.

blank