गोंदिया,दि.26 : शहरातील गणेशनगर परिसरात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर हा परिसर प्रशासनाने सील केला होता. मात्र सदर रुग्ण कोरोनामुक्त झाला असून यानंतरही या भागात कठोर नियम कायम ठेवण्यात आले होते. यामुळे या भागातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते.लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सतत पाठपुराव्यामुळे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी या भागातील लाॅकडाऊन शिथिल करण्याचे निर्देश दिल्याने नागरिकांना सुटकेचा श्वास सोडला आहे.
गणेशनगर परिसरातील नियमात शिथिलता देण्यात यावी, यासंदर्भात खासदार प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी (दि.२५) गणेशनगर परिसरातील नियम शिथिल करुन त्यांना ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन करु न दैनंदिन व्यवहार व व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली.पालकमंत्री देशमुख यांनी शनिवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीला खा. पटेल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, विनोद अग्रवाल, सहषराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी उपस्थित होते. बैठकीत खा. पटेल यांनी गणेशनगर परिसरातील जीवनावश्यक वस्तुंचा व्यापार करणारे व्यापारी, वैद्यकीय व्यवसाय करणारे, लहान मोठे व्यापारी रहिवासी डॉक्टर्स यांना गणेशनगर परिसरातून बाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यासंबंधी अधिकायाºंसोबत चर्चा केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी यात दिंरगाई केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांना चांगलेच फटकारले. एखाद्या आवश्यक माहितीसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास तो होत नसल्याने लोकप्रतिनिधी व नागरिकांना अडचण निर्माण होत असल्याने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकाºयांनी गणेशनगर परिसरात शनिवारी सायंकाळपासून टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत केले जाईल असे सांगितले. पालकमंत्री देशमुख यांनी याची गांर्भियाने दखल घेत अधिकाºयांना योग्य निर्देश दिले.
खा.पटेलांच्या सहकार्याने मार्ग -आमदार विनोद अग्रवाल
गणेशनगर परिसरात प्रशासनाने लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता देण्यात यावी यासाठी मागील १५ दिवसांपासून शासन आणि प्रशासनाकडे आपला पाठपुरावा सुरू होता. अखेर गृहमंत्री देशमुख यांनी शनिवारी या परिसरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल करण्याचे आदेश दिले. यामुळे गणेशनगरवासीयांना दिलासा मिळाला असून यासाठी खा. पटेल यांचे सहकार्य मिळाल्याचे आ. विनोद अग्रवाल यांनी सांगितले.
पाठपुराव्यानंतर निघाला मार्ग -माजी आमदार गोपालदास अग्रवाल
गणेशनगर परिसरात प्रशासनाने ‘लॉकडाऊन’चे नियम कठोर केल्याने या भागातील नागरिक व व्यावसायिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विभागीय आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर गणेशनगर परिसरातील ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता दिल्याने तेथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.





